महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NIA च्या चार्जशीटमध्ये काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप - नवाब मलिक लेटेस्ट न्यूज

परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठी NIA ने प्रयत्न केला आहे. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांना आरोपी करण्यात आले नाही, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Sep 8, 2021, 6:56 PM IST

Updated : Sep 8, 2021, 7:56 PM IST

मुंबई -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठी NIA ने प्रयत्न केला आहे. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांना आरोपी करण्यात आले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.

मंत्री नवाब मलिक

हेही वाचा -राजकीय वादळात सापडलं चिपी विमानतळ; नवाब मलिक म्हणाले...

  • NIA परमबीर सिंह यांना वाचवतंय - मलिक

NIA ने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले होते, असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. NIA च्या चार्जशीटमध्ये असलेल्या मुख्य आरोपींची चौकशी झाली नाही. एक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरंच काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु, NIA ने तसा तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्याचं काम NIA ने केले. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

हेही वाचा -बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस

Last Updated : Sep 8, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details