महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टीआरपी घोटाळा: रिपब्लिक'च्या मुख्य वित्त अधिकाऱ्याला पोलिसांचे समन्स, आज चौकशी - TRP scam News

टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक न्यूज नेटवर्कटच्या मुख्य वित्त अधिकरी शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

Mumbai Police summons Republic's Chief Financial Officer
मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक'च्या मुख्य वित्त अधिकऱ्याला समन्स

By

Published : Oct 10, 2020, 10:57 AM IST

Updated : Oct 10, 2020, 11:26 AM IST

मुंबई- टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना 13 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक न्यूज नेटवर्कटच्या मुख्य वित्त अधिकरी शिवा सुब्रमण्यम सुंदरम या अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.

टीआरपी घोटाळ्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. भारतात सध्या 400 हून अधिक वेगवेगळ्या भाषांतील वाहिन्यांचे प्रक्षेपण होते. जवळपास 32 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या क्षेत्रात टीआरपी'ला घेऊन नेहमीच स्पर्धा होते. प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांवरून प्रत्येक चॅनेलच्या जाहिरातींचे दर निश्चित केले जातात.

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी तब्बल 2000 बॅरोमिटर बसविण्यात आले. ही मशीन मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालय, निवास स्थान, हॉटेल्स व इतर ठिकाणी बसविण्यात आले. यावरून टीआरपीच्या आकडेवारीचा अंदाज ठरविण्यात जातो. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात या टीआरपी मोजणाऱ्या संस्थांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी काही विशिष्ठ व्यक्तींसोबत मिळून यात फेरफार केल्याचे लक्षात आले. यासंदर्भात विशाल भंडारी (20), बोंपेली राव मिस्त्री (44), शिरीष शेट्टी (44) , नारायण शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 10, 2020, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details