महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामींना कारणे दाखवा नोटीस - mumbai police give show cause notice to arnab goswami

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना 111 अंतर्गत क्रिमिनल प्रोसिजर नुसार मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे ही नोटीस विशेष कार्यकारी दंडाधिकारी , सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांच्याकडून अर्णब गोस्वामी यांना बजावण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये एका खासगी चॅनेलवर जातीय तणाव, धार्मिक द्वेष निर्माण होऊन निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढून एकोपा टीकवण्यास बाधक अशी वक्तव्ये केली जात असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

trp  scam mumbai police give show cause notice to arnab goswami
मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामींना कारणे दाखवा नोटीस

By

Published : Oct 14, 2020, 10:27 AM IST

मुंबई -टीआरपी घोटाळा संबंधी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असताना या प्रकरणातील हंसा रिसर्च ग्रुपचे सीईओ प्रवीण नीजार, नितीन देवकर यांची स्टेटमेंट मुंबई पोलिसांकडून रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. या बरोबरच काही कागदपत्र सुद्धा मुंबई पोलिसांकडे हंसा रिसर्च ग्रुपकडून जमा करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांकडे हंसा रिसर्च ग्रुपकडून विशाल भंडारी सारख्या इतर कर्मचाऱ्यांची नावे सुद्धा देण्यात आलेली आहे.


या संदर्भात चौकशी करत असलेल्या मुंबई पोलिसांचे एक एसआयटीचे पथक बार्क(barc)च्या ऑफिसमध्ये जाऊन आलेले आहे. याठिकाणी कशाप्रकारे टीआरपीची मोजणी होते याबद्दलची पडताळणी या पथकाने केली. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या विशाल भंडारीकडून मुंबई पोलिसांना एक डायरी मिळाली असून यात अनेक जणांची नावे असून पैशांची देवाणघेवाण झाल्याची नोंद सुद्धा या डायरीमध्ये करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलेल आहे. याबरोबरच पत्रकार अर्णव गोस्वामी यांना 111 अंतर्गत क्रिमिनल प्रोसिजर नुसार मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे ही नोटीस विशेष कार्यकारी दंडाधिकारी , सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांच्याकडून अर्णब गोस्वामी यांना बजावण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये एका खासगी चॅनेलवर जातीय तणाव, धार्मिक द्वेष निर्माण होऊन निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढून एकोपा टीकवण्यास बाधक अशी वक्तव्ये केली जात असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल असे म्हणत अर्णब गोस्वामी यांना या नोटीसद्वारे समज देण्यात आली आहे. अर्नब गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधक कारवाई का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. याचे उत्तर 16 ऑक्टोबरपर्यंत देण्यास सांगण्यात आलेला आहे.


रिपब्लिक न्यूजचे डिस्ट्रीब्यूटर हेड म्हणून काम करणाऱ्या धनशाम सिंग याच्याकडून सुद्धा मुंबई पोलिसांकडे काही कागदपत्र जमा करण्यात आलेली आहे. याबरोबरच या वृत्तवाहिनीच्या सीईओ विकास खानचंदानी, घनश्याम सिंग यांची मुंबई पोलिसांनी तब्बल 12 तास चौकशी केली आहे. मिर्झापूर येथून अटक करण्यात आलेल्या विनय त्रीपाठी याला 15 ऑक्‍टोबरपर्यंत ट्रांजिस्ट रिमांडमध्ये पाठवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details