महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

26/11 Mumbai Attack : पोलीस आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी जवानांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई पोलिसांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Tributes were paid to the martyrs
हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

By

Published : Nov 26, 2021, 10:44 AM IST

Updated : Nov 26, 2021, 11:41 AM IST

मुंबई - मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला १३ वर्ष ( 26/11 Mumbai Attack ) पूर्ण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील ( Police Commissioner's Office Mumbai ) पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी जवानांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई पोलिसांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

कुटुंबियांची भेट -

भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड ( Police Band ) तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

हे उपस्थित होते -

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ), पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ), गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पाण्डे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, हुतात्म्यांचे कुटुंबीयांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
Last Updated : Nov 26, 2021, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details