मुंबई - मेट्रो प्रकल्पासाठी आरेमध्ये वृक्षतोडीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आज पुन्हा एकदा कारशेड परिसरात पुन्हा आंदोलन करण्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक आदिवासी नागरिकांनी भर पावसात मानवी साखळी उभारुन सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर व युवासेनेचे पदाधिकारी कारशेड परीसरात वृक्षतोडीला विरोध करण्यास आले होते. मात्र, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शिवसेनेच्या विरोधातही घोषणाबाजी करत त्यांना तेथून जाण्यास सांगितले.