महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात, तिरंगी निवडणूक होणार - vidhan parishad election news

मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. मतफुटीची शक्यता वाढल्याने भाजपाचे टेन्शन वाढले आहे. १० डिसेंबरला मतदान होईपर्यंत आपल्या नगरसेवकांना विरोधी पक्षापासून सांभाळून ठेवण्याचे काम पक्षांना करावे लागणार आहे. निवडणुकीत काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्याने इतर पक्ष सावध झाले आहेत.

विधान परिषद
विधान परिषद

By

Published : Nov 23, 2021, 9:35 PM IST

मुंबई -मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर (Vidhan Parishad Election) दोन सदस्य निवडून दिले जातात. या दोन जागांसाठी भाजपाकडून राजहंस सिंग,(Bjp Rajhans Singh) शिवसेनेकडून सुनिल शिंदे ( shiv sena Sunil shinde) तर काँग्रेसकडून सुरेश कोपरकर (Congress Suresh Koparkar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन जागांसाठी तीन उमेदवार असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. नगरसेवक फुटण्याची भीती असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध झाले आहेत.

काँग्रेसचाही उमेदवार -

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडून दिले जातात. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर दोन सदस्य निवडून दिले जातात. विधान परिषदेची निवडणूक येत्या १० डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी काल (सोमवारी) भाजपाचे राजहंस सिंग, आज (मंगळवारी) शिवसेनेचे सुनिल शिंदे यांनी उमेवादारी अर्ज भरला आहे. निवडणूक लढवायची की नाही, यावर चर्चा होऊन नंतर उमेदवाराचे नाव घोषित करण्यात येईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. आज (मंगळवारी) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोपरकर यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी राजीव निवतकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. सुरेश कोपरकर हे काँग्रेसकडून भांडुपमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी सध्या नगरसेविका आहेत.

राजकीय पक्ष झाले सावध -

मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. मतफुटीची शक्यता वाढल्याने भाजपाचे टेन्शन वाढले आहे. १० डिसेंबरला मतदान होईपर्यंत आपल्या नगरसेवकांना विरोधी पक्षापासून सांभाळून ठेवण्याचे काम पक्षांना करावे लागणार आहे. निवडणुकीत काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्याने इतर पक्ष सावध झाले आहेत. विधान परिषदेवर पहिल्याच फेरीत निवडून जाण्यासाठी ७७ मतांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. दरम्यान आज (२३ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्जाची छाननी उद्या (बुधवारी) होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तर १० डिसेंबर रोजी पालिका मुख्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

पालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना - ९९
भाजप - ८३
काँग्रेस - ३०
राष्ट्रवादी - ८
समाजवादी पार्टी - ६
मनसे - १
एम आय एम - २

एकूण २२९

हेही वाचा -ST Workers Strike एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याच्या शरद पवारांच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details