मुंबई नुकतेच मुंबई मेट्रो तीन चे काम प्रगतीपथावर सुरू झाल्याचे आपण पाहत आहोत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार घालवून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरित मंजुरी दिली. हैदराबाद येथून नुकतेच मेट्रो रेल्वेचे चार डबे मुंबईत दाखलही झाले. मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या उपस्थितीत पहिली भुयारी रेल्वेची प्रायोगिक चाचणी झाली आहे. आम्हाला कमी बोलवर जास्त रन काढायचे आहेत. कमी वेळात जास्त कम करायचे आहे म्हणून आम्ही मेट्रो रेल्वे प्रकल्पाला तातडीने मंजुरी दिली, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
किती किलोमीटर मेट्रो मार्ग असेलएकूण मुंबई मेट्रो रेल्वेची लांबी 146 किलोमीटर असणार आहे. त्यात नऊ मेट्रो मार्ग असतील आणि त्याचे तीन टप्पे त्यांनी तयार केले.आता हा अखेरचा मेट्रो लाईन 3 सुरू असून 2023 पर्यंत हा पूर्ण होईल आणि 2023 मध्ये मुंबईची भुयारी मेट्रो रेल्वे धावू लागेल. मेट्रो रेल्वेमुळे मुंबईमधील रस्त्यावरील होणारी रोजच्या रोज वाहतूक कोंडी कमी होणार ही वाहतूक कोंडी जवळजवळ 35 टक्क्याने कमी होणार असल्याचे मेट्रो रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्यांनी ईटीव्ही भारत ला माहिती दिली.
कुठे होणार प्रायोगिक चाचणीअरे जंगलामध्ये कारखेड नको याबाबत देशभर दोन्ही बाजूने दावे प्रतिवादी होत आहेत. त्याच आरे कारशेड परिसरा जवळ सारिपुत्र नगर या रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी भुयारी मेट्रो रेल्वेची पहिली प्रायोगिक चाचणी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. सारीपूत नगर येथील चाचणी ट्रॅक त्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. या ट्रॅकवर ही प्रायोगिक चाचणी होणार आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठीचा निधीमुंबई मेट्रो तीन या प्रकल्पासाठी एकूण 23 हजार 136 कोटी रुपयांची अंदाजे गुंतवणूक अपेक्षित आहे . त्यापैकी जापान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था त्याद्वारे रुपये 13हजार 235 कोटी रुपये कर्ज देणार आहे ते मेट्रो रेल्वेच्या एकूण प्रकल्पा खर्चाच्या 57.2टक्के इतके आहे. मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बाकीचा निधी भारत सरकार, महाराष्ट्र शासन , मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून भांडवल स्वरूपात व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपात विविध पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाचा खर्च सुमारे १० हजार कोटींनी वाढलाराज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मेट्रो ३ प्रकाल्पला प्राधान्य Metro 3 project given priority in Cabinet meeting देण्यात आले. मुंबई मेट्रो Mumbai Metro २०२३ पर्यंत खुली होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी दिली होती. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १० हजार कोटींनी वाढला आहे. 50 टक्के खर्च केंद्र आणि राज्य सरकार करणार असून उर्वरित खर्च संबंधित कंपनी करेल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.
वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास मान्यता सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत. या सुधारित वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे जायका कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले असून वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.