मुंबई- राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईत आलेले शिवसेना खासदार ओम निंबाळकर यांच्या गाडीवर झाड कोसळले आहे. यामुळे त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. झाड कोसळले तेव्हा गाडीत कोणीही नव्हते यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
खासदारांच्या गाडीवर झाड कोसळले -मुंबईत शुक्रवारी, शनिवारी व रविवारी पाऊस झाला. याचवेळी राज्यसभेसाठी मतदान होते. मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी उस्मानाबाद येथील शिवसेनेचे खासदार ओम निंबाळकर मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात उतरले होते. त्यांनी आपली गाडी याच परिसरात पार्क केली होती. पावसा दरम्यान या परिसरात झाडे पडली. त्यापैकी एक झाड खासदार निंबाळकर यांच्या गाडीवर पडले. वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही दुर्घटना घडली तेव्हा गाडीत कोणीही नव्हते.