महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत मुसळधार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प - mumbai rain

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक विभाग जलमय झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. कुर्ला एलबीएस, सायन रेल्वेस्थानक, चुनाभट्टी आदी ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले होते.

Transport and local services disturbed due to heavy rain in mumbai
मुंबईत मुसळधार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प

By

Published : Sep 23, 2020, 11:50 AM IST

मुंबई - पावसाने रात्रीपासूनमुंबईला झोडपले असून या मुसळधार पावसामुळे मुंबई पूर्व उपनगरातील सखल भागात पाणी साचलेले पहायला मिळाले. चेंबूर, कुर्लासहीत सायनमध्ये पाणी साचले असून सायन आणि चुन्नाभट्टी रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लोकलवर याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प

मुंबई शहरसह पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक विभाग जलमय झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. कुर्ला एलबीएस, सायन रेल्वेस्थानक, चुनाभट्टी आदी ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पाण्याचा निचरा झाल्याने नसल्याने रस्त्यांवर जैसे थे परिस्थितीत आहे. पालिकेकडून पंपाद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू असून अनेक सखल भागात पालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details