मुंबई -मुंबई पोलीस दलातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये दोन डीसीपी दोन एसीपी आणि एक महिला पोलीस यांचा समावेश आहे. बदली केलेले पाचही पोलीस अधिकारी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जवळचे असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. या पोलीस अधिकाऱ्यांचा परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप आहे.
मुंबईतील परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ? - police officers transfer
मुंबई पोलीस दलातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यांचा परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप आहे.
कोणाची झाली बदली ?
पोलिस उपायुक्त - (डीसीपी) अकबर पठाण
पोलिस उपायुक्त - (डीसीपी EOW) पराग मानारे
सहायक पोलिस आयुक्त - (एसीपी) संजय पाटील
सहायक पोलिस आयुक्त - (एसीपी) श्रीकांत शिंदे
पोलिस निरीक्षक - आशा कोंरके
प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
काही दिवसांपूर्वी भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून परमबीर सिंह पाच पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हीच तक्रार या पाचही पोलीस अधिकाऱ्यांना भोवली आहे.
हेही वाचा -#NEET परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार!