महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

IAS Officers Transfer : राज्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या - Madhavi Khade-Chawre

मुंबईच्या हापकीन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक माधवी खाडे-चावरे यांची बदली नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी केली आहे. तर एड्स कंट्रोल सोसायटीचे मुख्य अधिकारी सी. के. डांगे यांच्याकडे कल्याण येथील राज्य विद्युत विभागाच्या सहसंचालक पदाचा पदभार सोपवला आहे.

विधीमंडळ
विधीमंडळ

By

Published : Apr 12, 2022, 11:08 AM IST

मुंबई- राज्याच्या प्रशासनातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिकऱ्यांच्या बदल्यावरून राज्य सरकार अडचणीत आले होते. कोविडचे संकटाची भर होती. त्यामुळे महत्वाच्या खात्यातील बदली व्यतिरिक्त अन्य बदल्यांना स्थगिती दिली होती. आता निर्बंध उठवल्यानंतर राज्य सरकारने विभागीय खात्यांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या हापकीन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक माधवी खाडे-चावरे यांची बदली नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी केली आहे. तर एड्स कंट्रोल सोसायटीचे मुख्य अधिकारी सी. के. डांगे यांच्याकडे कल्याण येथील राज्य विद्युत विभागाच्या सहसंचालक पदाचा पदभार सोपवला आहे. यशदा, पुणे व्यवस्थापकीय संचालक चिन्मय गोटमारे यांची महाराष्ट्र सामायिक परीक्षा एमएच-सीईटी या ठिकाणी आयुक्तपदी नेमणूक केली असून त्यांच्या जागी उपसंचालक विशाल सोळंकी यांची वर्णी लावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details