मुंबई - मंत्रालयातील काही आधिकाऱ्यांच्या जबाबदारीत खांदेपालट करण्यात आली आहे. म्हाडा मुंबईचे मुंबईचे मुख्य कार्यकारी आधिकारी मिलींद म्हैसकर यांची महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची महाजनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
मंत्रालयात खांदेपालट: सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - shift in the responsibilities of some officials
मंत्रालयातील काही आधिकाऱ्यांच्या जबाबदारीत खांदेपालट करण्यात आली आहे. आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्यांबरोबरच येत्या काही दिवसात पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदल्यानंतर राज्यातील पोलीस आधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी के. ए.च बगाटे यांची शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसात मंत्रालयातील आणखी काही आधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मंत्रालयातील आणखी काही आधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला असून पुण्यात पूर्ण वेळ जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आएएएस आधिकाऱ्यांच्या बदल्यांबरोबरच येत्या काही दिवसात पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदल्यानंतर राज्यातील पोलीस आधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे.