महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2022, 6:59 AM IST

ETV Bharat / city

IAS Transfer : राज्यातील ४० आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील नव्याने शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ( Big Decision of Shinde Government ) त्यांनी महाविकास आघाडीच्या बऱ्याच निर्णयांना स्थगिती दिली. काही निर्णय त्यांनी बदलले, या सर्वानंतर राज्यातील 40 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा वटहुकूम काढला ( Transfer of 40 IAS Officers Issued by Government ) आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली ( Transfer Especially on Close to Aditya Thackeray ) आहे.

Transfer of 40 IAS Officers
राज्यातील ४० आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई : राज्यात शिंदे सरकारने सत्तेवर येताच बदल्यांचा धडका सुरू केला आहे. आज ४० आयएएस अधिकाऱ्यांच्या ( Big Decision of Shinde Government ) बदलीचा वटहुकूम काढला ( Transfer of 40 IAS Officers Issued by Shinde Government ) असून, महाविकास आघाडीशी निगडित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची खांदेपालट ( All Officers Associated with Aghadi Transferred ) केली आहे. कोविड काळात राज्य सरकारची कार्यक्षम आरोग्य यंत्रणा ठेवणारे डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, वळसा नायर, दीपक कपूर, संजय खंदारे, प्रवीण दराडे, तुकाराम मुंढे, दीपक कपूर, मनीषा म्हैसकर, जयश्री भोज यांचा समावेश आहे.

आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर शिंदे सरकारकडून बदलीची मोहर :यामध्ये विशेषत: आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर शिंदे सरकारने ( Transfer Especially on Close to Aditya Thackeray ) बदलीची मोहर उठवल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे यांची नव्याने नियुक्ती :तर ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे यांची नियुक्ती झाली आहे. ठाण्याच्या महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली आहे. तर गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची विमानचालन व राज्य उत्पादन शुल्क, सामान्य प्रशासन विभागच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बदली :विकास आयुक्त (उद्योग) मुंबईचे डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकार, सामान्य प्रशासन विभागपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांची पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कारभारही त्यांच्याकडेच असेल.

महाराष्ट्र सह. दूध महा. संचालकांची अन्न व औषध आयुक्तपदी बदली :महाराष्ट्र सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले ए. आर. काळे यांची मुंबईच्या अन्न व औषध आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांची आदिवासी विकास विभागात अपर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांची पुणे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. राज्य ऊर्जा निर्मिती मर्या. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लीना बनसोड यांची ठाणे आदिवासी विभाग अति. आयुक्तपदी तर इतर अधिकारी...

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील भोज यांच्याकडे असेल. आदिवासी विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details