महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Central Railway : रेल्वेच्या इंटरलिंकिंग कामामुळे 'येथे' जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द - रेल्वेच्या इंटरलिंकिंग कामामुळे रेल्वेगाड्या रद्द

मुंबई ते उक्त मार्गावर चालणाऱ्या काही गाड्या तात्पुरत्या रद्द ( Trains on route from Mumbai are cancelled ) झालेल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो. विलासपूर मंडळात रेल्वेचे इंटरलिंकिंगचं काम सुरू ( Railway interlinking work is going on ) आहे.

Train cancelled
रेल्वेगाड्या रद्द

By

Published : Sep 28, 2022, 10:44 AM IST

मुंबई : मुंबई ते कलकत्ता तसेच बिलासपूर, पुरी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे बिलासपूर झोन मार्गे जाणाऱ्या बहुतांशी रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहे. यामुळे मुंबई ते उक्त मार्गावर चालणाऱ्या काही गाड्या तात्पुरत्या रद्द ( Trains on route from Mumbai are cancelled ) झालेल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो. प्रवाशांनी या सर्व बाबी पाहूनच रेल्वेचे आरक्षण करायला हवे. विलासपूर मंडळात रेल्वेचे इंटरलिंकिंगचं काम जोरात सुरू ( Railway interlinking work is going on ) आहे. या इंटरलिंकिंगच्या कामासाठी शेकडो कामगार, अभियंते सातत्याने राबत आहे. या कामामुळे मुंबईकडे कलकत्त्याहून येणाऱ्या गाड्या तसेच उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश येथून येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.


कोणत्या एक्सप्रेस बंद आहेत जाणून घ्या :ट्रेन क्रमांक 22511कर्मभूमी एक्सप्रेस, ट्रेन 12809 मुंबई ते हावडा मेल, ट्रेन 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस ते शामली, ट्रेन12101 लोकमान्य टिळक टर्मिनस ते शामली जणेश्वरी एक्सप्रेस, ट्रेन 12859 मुंबई ते हावडा गीतांजली एक्सप्रेस, ट्रेन 12261 मुंबई ते हावडा दुरांतो एक्सप्रेस, 12879 लोकमान्य टिळक ते भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस, ट्रेन 12151 लोकमान्य टिळक शामली समरसता एक्सप्रेस आणि ट्रेन 22865 लोकमान्य टिळक ते पुरी ओखा साप्ताहिक ट्रेन या गाड्या विशेषतः काम सुरू असेपर्यंत बंद राहतील. त्यामुळे या मार्गांवर या गाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांनी अद्ययावत सूचना आणि माहिती घेऊनच तिकीट आरक्षित करावे.

रेल्वेगाड्या रद्द



मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले की : यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बिलासपूर झोनमध्ये तांत्रिक, इलेक्ट्रिक आणि रेल्वे रूळ या संदर्भात अनेक इंटरलिंकिंगचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू करण्यात आले आहे. हे काम लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर या गाड्या पूर्ववत सुरू होतील. प्रवाशांनी आरक्षण करताना याबद्दल आधी माहिती घेऊन मगच त्या मार्गावरील आरक्षण करावे, अशी सूचना देखील त्यांनी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details