मुंबई - राज्यात कोरोनाचे एकूण 40 रुग्ण असून यात 26 पुरुष व 14 महिला आहेत. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईची लोकल आणि बस सेवा बंद करणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच जनतेने गर्दी कमी न केल्यास कठोर पाऊले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले. कोरोनासंदर्भातल्या उपाययोजनांसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे.
'सध्या रेल्वे, बस बंद नाहीत पण...'
मुंबईची लोकल आणि बस सेवा बंद करणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच जनतेने गर्दी कमी न केल्यास कठोर पाऊले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनतेने सहकार्य करावे. अनावश्यक प्रवास टाळावा. परंतू, रेल्वे व बस बंद करण्यात आल्या नाहीत. मात्र, गर्दी कमी न झाल्यास रेल्वे व बस बंद करण्यात येतील अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच सरकारी कार्यालये सध्या सुरळित सुरू आहेत. कमीतकमी कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयांमधील कामे होत असतील तर त्यांसदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अत्यावश्यक सेवांचे दुकाने वगळता बाकीच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच राज्यातील जवळपास सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आले आहेत. तसेच पुढचे 15 दिवस आपल्या सर्वांसाठी महत्ताचे आहेत. त्यामुळे जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.