महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोकणच्या गाड्या रद्द, संतप्त प्रवासी रेल्वे रुळावर - MUMBAI Rain NEWS

पावसामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ च्या रुळावर संतप्त प्रवाशी उतरले.

कोकणात जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्याने संतप्त प्रवासी

By

Published : Sep 5, 2019, 4:57 PM IST

मुंबई -बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. यामुळे संतप्त प्रवासी दादर स्थानकातील फलाट क्रमांक 5 च्या रुळावर उतरले. पोलिसांनी तत्काळ दादर स्थानकातील प्रवाशांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

घाट माथ्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. यामुळे दादर सावंतवाडी एक्सप्रेस स्थानकात उशिराने आली. यातच गाडीचे दरवाजे उघडत नसल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून आपला राग व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details