मुंबई - प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी अंगारकीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने प्रभादेवी येथील मंदिरात येतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. भाविकांच्या सोयीसाठी आणि रस्ते मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी एस. के. बोले रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून बंद रहाणार आहेत.
Traffic Diverted towards Siddhivinayak Mandir : अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल - Traffic Diverted towards Siddhivinayak Mandir
एस. वीर सावरकर रोड, एस.के. बोले रोड, गोखले रोड दक्षिण आणि उत्तर, अप्पासाहेब मराठे मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि सयानी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची ( Traffic Diverted towards Siddhivinayak Mandir ) शक्यता आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत एस. के. बोले रोड वरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल.
या रस्त्यांवरील वाहतूक बंद -
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त (मंगळवारी ) १९ एप्रिल २०२२ रोजी सिद्धी विनायक मंदिर, प्रभादेवी येथे भाविकांची मोठी गर्दी होणार असून त्यामुळे सिद्धी विनायक मंदिराच्या परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यात एस. वीर सावरकर रोड, एस.के. बोले रोड, गोखले रोड दक्षिण आणि उत्तर, अप्पासाहेब मराठे मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि सयानी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत एस. के. बोले रोड वरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल. याशिवाय गोखले रोडपासून दत्ता राऊळ रोड आणि एन.एम. काळे रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल. आगर बाजार जंक्शनपासून एस.के. बोले रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल. एस.के. बोले रोडवर फक्त सिद्धी विनायक जंक्शन येथूनच प्रवेश दिला जाईल. लेनिनग्राद चौक पासून शंकर घाणेकर रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसणार आहे.
हेही वाचा -Toilet Scam Case : शौचालय घोटाळा आरोपानंतर किरीट सोमैयांचे नगर विकास प्रधान सचिवांना पत्र