महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai weather forecast पावसामुळे मुंबईमधील वाहतूक मंदावली आणखी पाऊस पडण्याची शक्यता - आणखी पाऊस पडण्याची शक्यता

मुंबईमध्ये Mumbai आज सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे सकाळी ८ ते दुपारी २ या ६ तासाच्या काळात मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे यामुळे काही सखल भागात पाणी साचल्याने मुंबईमधील रस्ते वाहतूक मंदावली Traffic slowed down आहे आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असुन काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल तसेच अधूनमधून जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला Mumbai weather forecast आहे

Mumbai weather forecast
मुंबईत आणखी पाऊस पडण्याची शक्यता

By

Published : Aug 16, 2022, 4:59 PM IST

मुंबईमुंबईमध्ये Mumbai आज सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे पाणी साचल्याने मुंबईमधील रस्ते वाहतूक मंदावली Traffic slowed down आहे तर अंधेरी आणि मालाड येथील सब वे काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल तसेच अधूनमधून जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला Mumbai weather forecast आहे


इतक्या पावसाची झाली नोंदमुंबईत १५ ऑगस्ट सकाळी ८ वाजता पासुन ते १६ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत या २४ तासात शहर विभागात ७ १९ मिमी पूर्व उपनगरात १२ ९४ मिमी पश्चिम उपनगरात १२ ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुंबईमध्ये शहर विभागात सकाळी १० ते ११ या एका तासात जी साऊथ विभागात १९ मलबार हिल नायर हॉस्पिटल येथे १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली पूर्व उपनगरात एस वॉर्ड येथे १२ विक्रोळी फायर स्टेशन येथे ११ तर चेंबूर फायर स्टेशन येथे ११ तर एल वॉर्ड येथे ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली पश्चिम उपनगरात मालवणी फायर स्टेशन येथे २२ चिंचोली फायर स्टेशन येथे २० सांताक्रूझ येथे १७ के वेस्ट वॉर्ड येथे १६ तर एच इस्ट वॉर्ड येथे १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज दुपारी २ ५७ वाजता समुद्रामध्ये भरती असून त्यावेळी ४ ३९ मीटरच्या लाटा उसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे


रस्ते वाहतूक मंदावलीमुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी पाऊस पडला यामुळे पाणी साचल्याने हिंदमाता जंक्शन व महालक्ष्मी जंक्शन येथे अर्धा फूट पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे मालाड येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तेथील वाहतूक साईनाथ मार्गाच्या दिशेने वळवण्यात आली आहे अंधेरी सब वे येथे अर्धा फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पाण्याचा निचरा झाल्यावर येथील वाहतूक पुन्हा सुरु केली जाणार आहे दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु असली तरी ट्रेन उशिराने धावत आहे



हेही वाचाAmrita Fadnavis रामायण काळापासून आदिवासी समाजाचे देशासाठी योगदान

ABOUT THE AUTHOR

...view details