महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वाशी टोल नाक्यावर वर्दळ वाढली ; लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याचा परिणाम - lockdown in mumbai

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या भागांमध्ये लॉकडाऊन मधील काही नियम शिथील करण्यात येणार असल्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. यानंतर वाशीच्या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

washi toll plaza
वाशी टोल नाक्यावर वर्दळ वाढली ; लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्याचा परिणाम

By

Published : Apr 20, 2020, 11:23 AM IST

मुंबई - कोरोनाबांधितांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. यासाठी ग्रीन, ऑरेज, रेड झोन्स देखील करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या भागांमध्ये लॉकडाऊनमधील काही नियम शिथील करण्यात येणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. मात्र, याचा विपरित परिणाम पाहायला मिळत आहे.

वाशी टोल नाक्यावर वर्दळ वाढली ; लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्याचा परिणाम

20 एप्रिल पासून राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही ठिकाणी ठराविक उत्पादनांच्या विक्रीला सूट देणार असल्याचे शासनाने सांगितले. यानंंतर शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये 10 टक्के उपस्थिती करण्यात आलेली असून माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. टोल वसुली सुरू करण्यात आल्यामुळे वाशी टोल नाक्यावर वाहनांची रांग पाहायला मिळाली. यामुळे शहरातील वर्दळ पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details