मुंबई : सध्या मान्सूनचे वातावरण असले तरी जूनमध्ये म्हणावा असा पाऊस पडला नाही. मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासात मुंबई शहरात ११९.०९, पूर्व उपनगरात ५८.४० तर पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामाना विभागाचा अलर्ट :५ दिवस मुसळधार -
गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज असल्याचे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसणार कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसामुळे कुठेही पाणी साचले नसल्याने रस्ते किंवा रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईतील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दिवसभरात पडलेला पाऊस :कुलाबा येथे १२५ .६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझ येथे ५२.४ मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईत काल दिवसभरात जोरदार पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने तुंबले होते.तर बरेच ठिकाणी वाहने पाण्यात अडकून पडली होती.मुंबई शहरात ११९.०९ मिलिमीटर नोंद झाली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरात 58.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात 78.69 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.