मुंबई -बॉलिवूडचे क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ( Ranbir and Alia Wedding ) गुरुवारी (दि. 14 एप्रिल) लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नासाठी वांद्रेमधील रणबीर कपूरचा राहत्या घरी बॉलिवूडमधील दिग्गजांनी आज हजेरी लावली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ( Traffic Jam ) आहे. झाले आहे. याबाबत ओलाने ( ola ) ट्वीट करत माहिती दिली. वांद्र्याच्या परिसरात प्रवासासाठी नेहमीपेक्षा आज जास्त वेळ लागत आहे, असेट ट्वीट ओलाकडून करण्यात आले आहे.
मोजक्या पाहुण्यांना आमंत्रण -रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाह पार पडला आहे. अहवालानुसार दोघांनी सात फेरे घेतले आहेत. आता ही जोडी अधिकृतरित्या पती पत्नी बनले आहेत. या विवाह सोहळ्याला दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. बुधवारपासून या विवाहाची चर्चा सर्व माध्यामावर सुरू आहे. हे लग्न मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्यात मॅरेज इव्हेन्ट कंपनीला यश मिळाले आहे.