महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, परिसरात वाहतूक कोंडी - News about Mumbai traffic congestion

मुंबई शहरातील रस्ते वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम एमएस आरडीसीने हाती घेतले आहे. यामुळे परीसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

Traffic congestion in the area due to repair work of Sion Flight Bridge
सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम आज सकाळपासूनच परिसरात मात्र वाहतूक कोंडी

By

Published : Feb 14, 2020, 12:21 PM IST

मुंबई -शहरातील रस्ते वाहतुकिसाठी महत्त्वाचा असलेला सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम आज सकाळी पाच वाजल्यापासून हाती घेण्यात आले आहे. यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडे येणारी व मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनाच्या रांगा या परिसरात मोठ्या प्रमाणात लागल्या असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम आज सकाळपासूनच परिसरात मात्र वाहतूक कोंडी

पूर्व उपनगरातील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापासून रखडले होते. हा पूल जड वाहनांसाठी धोकादायक असल्याने त्यावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, छोट्या व हलक्या वाहनासाठी पुलावरून वाहतूक सुरळीत चालू होती. आज एमएसआरडीसीने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून यात पूलाचे बेरिंग बदलण्याचे काम आठवड्यातील चार दिवस केले जाणार असून ही दुरुस्ती 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details