महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बारसिंगे दाखल झाल्याने राणीबागेच्या वैभवात भर; पर्यटकांचा वाढला ओघ - Rani Zoo

बारसिंगे भारताच्या मध्य, उत्तर आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये आढळतात. प्राणीसंग्रहालयातील दोन्ही  हरणे ही पाच वर्षांची आहेत. त्यांचे सरासरी आयुष्यमान २३ वर्षे इतके असते.

बारासिंगा हरिण

By

Published : May 6, 2019, 5:03 PM IST

मुंबई - राणीबागेत पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध झालेल्या बारासिंगेमुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. प्राणी संग्रहालयात रविवारी होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत दोन हजाराने वाढ होऊन १२ हजार पर्यटकांची नोंद झाली आहे. तर पाच लाख रुपयांचा महसूल राणीबागेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) कानपूर प्राणी संग्रहालय, येथून बारसिंगेची (स्वॅम डीअर) जोडी आणण्यात आली. त्यांना पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांची गर्दी झाली होती.
राणीबागेचा बदलत आहे चेहरामोहरा -
वीर जिजामाता भोसले उद्यान हे मुंबईचे वैभव आहे. मुंबई, उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही राणीबागेला भेट देतात. गर्दीने घुसमटलेल्या मुंबईकरांना विरंगुळ्याचे तेच हक्काचे ठिकाण आहे. मात्र जागेअभावी येथे सुधारणा करण्यात महापालिकेला मर्यादा येत होत्या. पण शेजारील मफतलाल ग्रुपची जागा ताब्यात आल्यानंतर महापालिकेने येथे सुधारणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राणीबागेचा चेहरामोहरा बदलत आहे.

पेंग्विन प्राणीसंग्रहालयात आणल्यानंतर येथील पर्यटकांची रोजची होणारी गर्दी वाढली. त्यानंतर बिबटे आणि कोल्हे प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले. प्राणी हस्तांतरण प्रकल्पांतर्गत मिलिटरी मकाव यांची एक जोडी आणि नाईट हेरॉन यांच्या तीन जोड्यांच्या बदल्यात कानपूर प्राणीसंग्रहालयाकडून ८ मार्चला बारसिंगाची (स्वॅम्प डीअर) एक जोडी आणण्यात आली.

राणी बाग प्राणीसंग्रहालय

काय आहे बारसिंगे -
बारसिंगे ही प्रजाती हरीण संवर्गातील आहे. बारसिंगे भारताच्या मध्य, उत्तर आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये आढळतात. प्राणीसंग्रहालयातील दोन्ही हरणे ही पाच वर्षांची आहेत. त्यांचे सरासरी आयुष्यमान २३ वर्षे इतके असते. त्यांच्याकरीता बांधण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये, कृत्रिम तलाव, अन्न पुरवठ्याची खोली आणि विश्रांतीकरता दलदलीचा भाग व छप्पर या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

पर्यटकांच्या संख्येत वाढ -

बारसिंगेची जोडी पर्यटकांसाठी खुली केलेल्या पहिल्याच दिवशी रविवारी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. दर रविवारी व सुटीच्या दिवशी सुमारे ९ ते १० हजार पर्यटकांची नोंद होते. बारसिंगे दाखल झाल्याने या संख्येत वाढ होऊन १२ हजारांहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीत पाच लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाच्या प्रयत्नांना यश असल्याने प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी सुखावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details