मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राज्याने एकूण 10 लाख कोरोना रुग्णांचा आकडा ओलांडला आहे. आज दिवसभरात 24 हजार 886 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर, 393 रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दिवसभरात कोरोनाची सर्वोच्च वाढ; राज्याने ओलांडला 10 लाखांचा आकडा - कोरोना लेटेस्ट न्यूज
आज दिवसभरात 24 हजार 886 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
corona
आतापर्यंत राज्यात एकूण 10 लाख 15 हजार 681 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील 7 लाख 15 हजार 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 2 लाख 71 हजार 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 28 हजार 724 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.