महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. यादरम्यान ११ ठिकाणी घरे आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात वाशीनाका येथे 15 मृत्यू तर 2 जखमी, विक्रोळी सुर्या नगर येथे 5 मृत्यू तर मुलुंड येथे एका मुलाचा अशा एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना
मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना

By

Published : Jul 18, 2021, 1:02 PM IST

मुंबई - मुंबईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. यादरम्यान ११ ठिकाणी घरे आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात वाशीनाका येथे 15 मृत्यू तर 2 जखमी, विक्रोळी सुर्या नगर येथे 5 मृत्यू तर मुलुंड येथे एका मुलाचा अशा एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाणी साचल्याने त्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे.

  • मुंबईत रात्रीपासून पडणाऱ्या पावसादरम्यान घर आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या ३ घटनेत २१ जणांचा मृत्यू
  • वाशी नाका येथे 15
  • विक्रोळी सुर्या नगर येथे 5
  • मुलुंड येथे 1
  • एकूण 21 मृत्यू

11 ठिकाणी दुर्घटना -
मुंबईत काल रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. काल शनिवारी सकाळी 8 ते आज रविवारी सकाळी 8 या 24 तासात मुंबई शहरात १७६.९६ मिलिमीटर पश्चिम उपनगरात १९५.४८ मिलिमीटर
पूर्व उपनगरात २०४.०७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तीन ते चार तासात मुसळधार पाऊस पडल्याने पूर्व उपनगरात ४ व पश्चिम उपनगरात अशा एकूण ७ अशा एकूण ११ ठिकाणी घर व भिंतीचा भाग पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सदर तक्रारी संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले आहे.


वाशीनाका येथे 15 जणांचा मृत्यू -

आज रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षामार्फत वाशी नाका, न्यु भारत नगर, वांझार दांडा, माहूल चेंबुर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळल्यामुळे 4 ते 5 घरे पडल्याची माहिती प्राप्त झाली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक मदतकार्य घटनास्थळी रवाना करण्यात आले. सदर ठिकाण जिल्हाधिकारी ( उपनगरे ) यांच्या अखत्यारीत आहे. ही घटना अग्निशमन दलामार्फत सकाळी 4:38 वाजाता लेव्हल 2 ची घटना घोषीत करण्यात आली. अग्निशमन दलामार्फत घटनास्थळी 6 फायर इंजिन , 1 रेस्क्यु व्हॅन , प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी वर्ग तसेच एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त , कार्यकारी अभियंता , सहाय्यक अभियंता , कनिष्ठ अभियंता व 20 कामगार मदतकार्य करीत आहेत . घटनास्थळी शोध कार्य सुरू आहे. राजावाडी रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार सदर घटनेत जखमी झालेल्या 19 लोकांना उपचारार्थ रुग्णालयात आणण्यात आले पैकी 15 लोकांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यु झाला असून २ किरकोळ जखमींना उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे.

सूर्या नगरला 5 जणांचा मृत्यू -


रविवारी (१८.०७.२०२१) मध्यरात्री २:४० वा . पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार विक्रोळी येथील सुर्यानगर मधील पंचशील चाळीतील 6 घरांवर दरडीचा भाग कोसळल्यामुळे त्यात 3 लोक जखमी झाले. जखमींना उपचारार्थ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार जखमींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. सदर ठिकाण वन विभागाच्या अखत्यारीत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सुनिचित कार्यपध्दतीप्रमाणे मदतकार्य घटनास्थळी रवाना करण्यात आले . घटनास्थळी शोध व विमोचन कार्य सुरु आहे.

मुलुंडमध्ये मुलाचा मृत्यू -
आज पहाटे 4:55 वाजता पोलीस नियंत्रण कक्षातून प्राप्त माहितीनुसार भांडूप ( प ) येथील कोंबड गल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराचा भिंतीचा भाग पडून त्यात सोहम महादेव थोरात , वय 16 वर्षे हा मुलगा जखमी झाले, त्यांना उपचारार्थ एम टी अग्रवाल , मुलुंड येथे दाखल करण्यात आले. एम टी अग्रवाल, मुलुंड येथून प्राप्त माहितीनुसार सोहम थोरात यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषीत करण्यात आले.

दोन जण जखमी -
आज सकाळी 6:30 वाजता राजावाडी रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार चांदिवली येथील संघर्ष नगर येथे दरडीचा काही दगड इमारत क्रमांक 19 वर पडल्यामुळे त्यात 2 लोक जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.


या ठिकाणी साचले पाणी-
शहर - १ ) हिंदमाता २ ) सायन रोड न . २४ ३ ) गांधी मार्केट ४ ) वडाळा चर्च ५ ) सक्कर पंचायत चौक ६ ) ७ ) नायर रुग्णालय ८ ) संगमनगर वडाळा ९ ) मडकेबुवा चौक

पूर्व उपनगर - १ ) शितल सिनेमा २ ) शेल कॉलनी ३ ) आरसीएफ कॉलनी ४ ) अंजनाबाई नगर ५ ) अणुशक्ती नगर ६ ) कुर्ला आगार ७ ) शेरे पंचाब कॉलनी ८ ) मानखुर्द रेल्वे स्थानक ९ ) नेहरु नगर १० ) स्वस्तिक चेंबर्स ११ ) कल्पना सिनेमा १२ ) टेंबी ब्रीज

पश्चिम उपनगर : १ ) नॅशनल कॉलेज , बांद्रा ( प ) २ ) साईनाथ सबवे ३ ) मिलन सबवे ४ ) अंधेरी सबवे ५ ) अंधेरी मार्केट ६ ) दहिसर सबवे ७ ) बांद्रा टॉकीज ८ ) वीरा देसाई रोड अंधेरी ( प ) ९ ) वाकोला ब्रीज १० ) बेस्ट नगर , गोरेगांव


शॉर्टसर्किट, झाडांची पडझड -

शहरात ६ , पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १ , पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात ६ अशा झाडे / फांद्या पडण्याच्या एकूण ९ तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले . मार नाही . ०. झाडे / फांदया पडण्याच्या तक्रारी : - शहरात १ , पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात ६ अशा झाडे / फांद्या पडण्याच्या एकूण ९ तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या . सर्व तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आलेल्या आहेत . झाडे / फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु आहे . मार नाही

वाहतूक व्यवस्था -
मध्य रेल्वेची अप व डाऊन मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक बंद असून ट्रान्स हार्बर वाहतूक सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक बोरीवली ते चर्चगेट स्थानकांदरम्यान सुरु आहे.

बेस्ट मार्ग वळवले -
शहरात - १ ) हिंदमाता २ ) गांधी मार्केट ३ ) वडाळा चर्च ४ ) सक्कर पंचायत चौक ५ ) अंबीका मिल ६ ) नायर रुग्णालय ७ ) संगमनगर वडाळा ८ ) मडकेबुवा चौक

पूर्व उपनगरात- १ ) शितल सिनेमा २ ) शेल कॉलनी ३ ) आरसीएफ कॉलनी ४ ) अणुशक्ती नगर ५ ) कुर्ला आगार ६ ) नेहरु नगर ७ ) कल्पना सिनेमा

पश्चिम उपनगरे - १ ) नॅशनल कॉलेज , बांद्रा ( प ) २ ) अंधेरी मार्केट ३ ) बांद्रा टॉकीज ४ ) वीरा देसाई रोड अंधेरी ( प ) ५ ) वाकोला ब्रीज

ABOUT THE AUTHOR

...view details