मुंबई- गोव्याहून मुंबईत आलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील 1 हजार 827 प्रवाशांची दोन प्रयोग शाळांनी कोरोना चाचण्या केल्या. त्यापैकी एका प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालानुसार 123 प्रवासी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दुसऱ्या लॅबमधील 832 जणांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे क्रूझवरील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 183 झाली आहे.
१३९ जण कोविड बाधित
कार्डिला क्रूझ प्रवाशांना घेऊन गोव्याला गेली होती. गोव्यात पोहोचताच तेथील सरकारने प्रवाशांच्या चाचण्या केल्या असता 60 प्रवासी कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी 41 प्रवाशांना कोविड सेंटर आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. इतर प्रवासी आणि क्रू-मेंबर यांची चाचणी करण्यात आली. एकूण 1 हजार 827 प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली होती. दोन वैद्यकीय प्रयोगशाळांनी मिळून या सर्वांची चाचणी केली होती. एका वैद्यकीय प्रयोगशाळेने 995 प्रवाशांची चाचणी केली होती. त्यामध्ये 995 पैकी 123 जण कोरोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित 832 जणांची चाचणी दुसऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळेने केली असून त्यांचे अहवाल काही वेळाने प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने कळविले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने रात्री उशिरा दिलेल्या वृत्तानुसार आणखी १६ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.