मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. गुरूवारी 13,413 तर आतापर्यंत एकूण 1,47,438 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 98 हजार 388 आरोग्य तर 49 हजार 050 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे. गुरुवारी 10,500 चे उद्दिष्ट असताना त्यापेक्षा अधिक 128 टक्के म्हणजेच 13,413 इतके लसीकरण झाले.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत गुरुवारी 128 टक्के लसीकरण, आतापर्यंत 1 लाख 47 हजार 438 कर्मचाऱ्यांना लस - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
9 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत गुरुवारी 28 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 3000 आरोग्य कर्मचारी तर 7500 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,500 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच 13,413 जणांना लस देण्यात आली
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत गुरुवारी 28 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 3000 आरोग्य कर्मचारी तर 7500 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,500 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच 13,413 जणांना लस देण्यात आली. त्यातील 12 हजार 459 लाभार्थ्यांना पहिला तर 954 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 13 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1,45,808 लाभार्थ्यांना पहिला तर 1630 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1,47,438 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कामा हॉस्पिटल 431, जसलोक हॉस्पिटल 63, एच एन रिलायंस 77, सैफी रुग्णालय 59, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 9, कस्तुरबा हॉस्पिटल 2147, नायर हॉस्पिटल 18778, जेजे हॉस्पिटल 1126, केईएम 17509, सायन हॉस्पिटल 7946, व्ही एन देसाई 2313, बिकेसी जंबो 14490, बांद्रा भाभा 6253, सेव्हन हिल हॉस्पिटल 10023, कूपर हॉस्पिटल 10606, गोरेगाव नेस्को 5649, एस के पाटील 1927, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1116, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 14711, दहिसर जंबो 2036, भगवती हॉस्पिटल 1435, कुर्ला भाभा 925, सॅनिटरी गोवंडी 2321, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 2065, राजावाडी हॉस्पिटल 15563, एल. एच. हिरानंदानी 10, वीर सावरकर 1850, मुलुंड जंबो 3453 अशा एकूण 1 लाख 45 हजार 808 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरा डोस म्हणून 1630 अशा एकूण 1 लाख 47 हजार 438 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.