मुंबई - मोसमी पाऊस परतला असला तरी हवामानात झालेल्या बदलामुळे दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 2 नोव्हेंबरनंतर पुढील चार ते पाच दिवस पावसाची स्थिती असेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
31-10 नोव्हेंबरदरम्यान पाऊस?
४-१० नोव्हेंबरदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. हे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर 10 नोव्हेंबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे, तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात 31-10 नोव्हेंबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात 2 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे.
मराठवाडा तुरळक ठिकाणी 3 नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह विजाच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.