आमदार गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना मैदानात येण्याचं खुले आव्हान
सोलापूर- आमदार गोपीचंद पडळकरांवर सोलापुरातील मड्डी वस्ती येथे हल्ला झाला. यानंतर गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. मुंबईहुन भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची फोनवरून विचारपूस केली आणि समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु गोपीचंद पडळकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी फोन वरून माहिती देताना पुन्हा एकदा शरद पवार यांना टार्गेट केले आणि माझं खुल आव्हान शरद पवारांनी स्वीकारावे, असे सांगितले. सविस्तर वृत्त -
गुलशन कुमार हत्याकांड: मारेकरी अब्दुल रौफची याचिका हायकोर्टाने फेटाळली
मुंबई- गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई न्यायालयाने मारेकरी अब्दुल रौफची याचिका फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं रौफला दिलेली जन्मठेपेची शिक्षा योग्य असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. याशिवाय या प्रकरणातील दुसरा एक आरोपी अब्दुल राशिदची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यालाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. बॉलिवूडमधील म्युझिक इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीत निर्माते गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी भागात एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सविस्तर वृत्त -
अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय मार्फत चौकशी करा; चंद्रकांत पाटील यांचे अमित शहांना पत्र
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. सविस्तर वृत्त -
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक, बैठकीत 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा..
मुंबई - मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. तसेच समन्वय समितीचे सदस्य व उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदि उपस्थित होते. सविस्तर वृत्त -
केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार नाही - अजित पवार
नाशिक- शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज(गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले. सविस्तर वृत्त -