औरंगाबाद- राज्यात अनेक ठिकाणी राजकीय मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सोबत घेऊन याबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लोक वापर मास्क वापरत नाही. त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, हे सर्व गांभीर्याने घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
सविस्तर वृत्त -राजकीय पक्षांच्या मेळाव्यांबाबत निर्णय घ्यावा लागेल - अजित पवार
मुंबई -मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात २ ते 3 हजारांवर असलेली रुग्णसंख्या ४ हजारांवर गेली आहे. तर मुंबईत ३०० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या ६०० च्या वर गेली आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी आंणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढाव बैठक बोलावली असून त्यात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर वृत्त -'ईटीव्ही भारत' विशेष - कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक
नागपूर - सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ट्विटमागे असणाऱ्या भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नाव प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, तपास सुरू असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून बाहेर पडताना गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते.
सविस्तर वृत्त -सेलिब्रिटी ट्विट प्रकरण : भाजप आयटी सेलप्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नावं समोर - गृहमंत्री
मुंबई - राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. रविवारी 4092 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात काही प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आज(15 फेब्रुवारी) 3365 नवे रुग्ण आढळून आले असून, 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त -राज्यात सोमवारी 3365 नवीन कोरोनाबाधित; 23 मृत्यू
बीड - नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे एक पथक सोमवारी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच झडती घेतली. तसेच त्याच्या नातेवाईकांची चौकशीही केली.