मुंबई -प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक आणि सत्ताधारी चहापान करत अधिवेशनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र, सध्या राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 5 जुलैला होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. तर, तिथेच अधिवेशनात मांडले जाणारे ठराव, तसेच महत्त्वाच्या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी घेतली जाणारी पत्रकार परिषदही मुख्यमंत्र्यांकडून टाळण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी ५ जुलै आणि ६ जुलै २०२१ असे दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसांत ठाकरे सरकारकडून ५ नवी विधेयके तर २ प्रलंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे, विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत. सविस्तर वाचा...
मुंबई - कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम करण्यात येत आहे. हे सरकार अधिवेशनाला तोंड न देता पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, असा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर केला. अधिवेशनात १०० पेक्षा अधिक मुद्दे आम्ही मांडणार होतो, मात्र पुरवण्या मागण्यांमध्ये आम्हाला हे विषय मांडू दिले जाणार नाही. त्यामुळे हे मुद्दे रस्त्यावर, लोकांमध्ये जाऊन मांडू, असेही फडणवीस यांनी ठणकावले. सविस्तर वाचा...
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्यावर्षी धारावी हॉटस्पॉट बनली होती. मात्र, याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत. सविस्तर वाचा...
श्रीनगर -जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी असा आदेश जारी केला असून पोलिसांना ड्रोन संबंधित कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. जिल्ह्याच्या प्रदेश कार्यक्षेत्रात ड्रोन किंवा तत्सम इतर उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे, असे श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी सांगितले. सविस्तर वाचा...