आज दिवसभरात -
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना
पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला होता. या विजयासह दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवशीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 ला सामन्यास सुरुवात होईल. दुसऱ्या सामन्यासोबत एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आज आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. तसेच, केएल राहुलच्या नेतृत्वाचा कसही लागणार आहे. ही मालिका खेचून आणल्यास राहुलला कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दावेदारी करता येऊ शकते.
- अनिल देशमुखांवरील आरोपांवर अंतिम सुनावणीची शक्यता
मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्याप्रकरणी अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल चौकशी करत आहेत. त्यावर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
- शाळा सुरु होण्याबाबत नियमावली जाहीर होणार
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली होती. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल दिलेली. मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजूरी दिली आहे. त्यानंतर 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहे. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. याबाबत आज नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
आजचे राशीभविष्य -