आज दिवसभरात -
- बुल्लीबाई अॅप प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज सुनावणीची शक्यता
बुल्लीबाई अॅप प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या वांद्रे न्यायालयाने विशाल कुमार झा, मयंक रावत आणि श्वेता सिंग यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 20 जानेवारीपर्यंत राखून ठेवला होता. मात्र, या तिघांच्या जामीन अर्जाला मुंबईच्या सायबर पोलिसांनी कडाडून विरोध केलेला.
- अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर
'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवस पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते चंडीगडला भेट देणार आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांनी गोवा मुख्यमंत्रीपदासाठी अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
- शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच, उमेदवारांची पहिली यादी आज आणि दुसरी यादी दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
- कालीचरण महाराजाच्या जामीन अर्जांवर सुनावणी
महात्मा गांधीवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाजावर वर्ध्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी कालीचरण महाराजाला 12 जानेवारीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. तेव्हा कालीचरण महाराजाच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे.