महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya Visiting Korlai Alibag : कोर्लईला भेट देऊन सत्य समोर आणणार - किरीट सोमैया - किरीट सोमैया अलिबाग भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच सोमैय्यांनी केलेल्या आरोपांवरही खुलासा केला. मात्र सोमैया यांनी या खुलाशानंतर आता रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे जाऊन आपण केलेल्या आरोपातील तथ्य समोर आणणार असल्याचे म्हटले ( Kirit Somaiya Visiting Korlai Alibag ) आहे.

Kirit Somaiya Visiting Korlai Alibag
किरीट सोमैया संजय राऊत

By

Published : Feb 17, 2022, 10:52 PM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच सोमैय्यांनी केलेल्या आरोपांवरही खुलासा केला. मात्र सोमैया यांनी या खुलाशानंतर आता रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे जाऊन आपण केलेल्या आरोपातील तथ्य समोर आणणार असल्याचे म्हटले ( Kirit Somaiya Visiting Korlai Alibag ) आहे.

कोर्लई गावात जाणारच -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने असलेली जमीन आणि बंगले यांचे सत्य उघडकीस आणण्यासाठी किरीट सोमैया उद्या रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात जाणार आहेत. यासंबंधी सोमैया म्हणाले, 'मी स्वतः कोर्लई गावात जाणार आहे. मला विरोध करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी, मी तिथे जाऊन सत्य उघडकीस आणणारच.' सोमैय्यांनी गुरुवारी सकाळी काही कागदपत्र ट्विट करुन, ही कोर्लई गावातून मिळालली कागदपत्र असल्याचा दावा केला होता.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून -

सोमैय्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते, की रश्मी ठाकरेंनी कोर्लई ग्रामपंचातला १९ बंगले त्यांच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रही सोमैय्यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर सोमैय्यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन कोर्लई गाव अलिबागला भेट देणार असल्याचे म्हटले आहे. सोमैय्यांच्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा -KCR to Meet CM Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री ठाकरेंची घेणार भेट; विरोधकांची मोट बांधण्याचा नवा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details