मुंबई - 'आपलीच मोरी मुतायची चोरी' आपल्या मराठी ही एक अस्खलित म्हण आहे. या म्हणीचा नेमका अर्थ काय? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चांदीवली जावे लागेल. कारण, चांदीवलीत बृहन्मुंबई ( toilet built in Chandivali closed after inauguration ) महानगरपालिकेच्या पैशातून एक मुतारी बांधण्यात आली. या मुतारीचे थाटामाटात ( toilet built in Chandivali ) भव्य दिव्य असे लोकार्पण देखील करण्यात आले. मात्र, या मुतारीचे लोकार्पण झाल्यानंतर ( toilet built in Chandivali by bmc money ) पुढच्या काही दिवसांत ही मुतारी वापरासाठी बंद करण्यात आली. आता जवळपास सहा महिने झाले ही मुतारी बंद आहे. नेमकी काय आहेत कारणे? आणि काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया? याचा आढावा 'ईटीव्ही भारते' घेतला.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात, शेलारंवर राज्याचा भार ?
14 लाखांची मुतारी -देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे. या शहराची लोकसंख्या करोडोंच्या घरात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईत तितकीच सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या आहेत. या सर्वांची देखभाल करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. कांदिवली विधानसभा मतदारसंघातील काजूपाडा येथे तब्बल 14 लाखांची एक मुतारी बांधण्यात आली. ही मुतारी प्रभाग क्रमांक 163 चे माजी नगरसेवक व सध्याचे आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आल्याचे या मुतारीवरील फलकावरून लक्षात येते. तशा आशयाचे फलकच या मुतारीवर लावण्यात आले आहे. मुतारीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे थाटात लोकार्पण करण्यात आले. पण, उद्घाटन झाल्यापासून ही मुतारी वापरासाठी बंद आहे, असे इथले स्थानिक रहिवासी सांगतात.
इतका खर्च कशासाठी -याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना इथले स्थानिक रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते अॅड. कैलास आगवणे म्हणाले की, या मुतारीचे सहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते. पण, या मुतारीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मुतारीची अतिशय दुरवस्था झाली आहे. आमच्या मनात शंका आली म्हणून आम्ही माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला. त्यानुसार या 10 बाय 6 च्या मुतारीसाठी अंदाजे 3 लाख रुपये खर्च होणे अपेक्षित होते आणि यांनी इथे तब्बल 14 लाख रुपये खर्च केले आहेत. आमचा प्रश्न हाच आहे इतका खर्च कशासाठी?
'शासन का माल और मेरा कमाल' -फेब्रुवारी 2021 मध्ये याच्या कामाला सुरुवात झाली. त्याचवेळी आम्हाला संशय आला की यात काहीतरी काळबेर आहे. तेव्हा आमच्या लक्षात आले या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होता. याबाबत जेव्हा मी तक्रारी केल्या तेव्हा त्यांचे प्रयत्न हाणून पडले. आपल्याकडे एक चित्रपट आला मुळशी पॅटर्न त्याप्रमाणे आमच्याकडे इथे चांदीवली पॅटर्न आहे. मोकळी जागा दिसली की त्यावर कब्जा करायचा असा हा पॅटर्न आहे. हे जी काम केली जात आहेत त्यासाठी लागणारा पैसा फंड हा शासनाचा आणि नाव मात्र यांची म्हणजे शासन का माल और मेरा कमाल असा यांचा फंडा आहे, अशी प्रतिक्रिया इथले स्थानिक रहिवासी रियाज वजीर मुल्ला यांनी दिली आहे.
मुतारीचा उद्देश्याबाबत बोलताना इथले स्थानिक रहिवासी बाबू बतेली म्हणाले की, हा परिसर अतिशय रहदारीचा, वर्दळीचा आहे. इथे बाजूलाच एक मोठी शाळा आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि त्यांना परत नेण्यासाठी बरेच पालक इथे वेटिंगवर उभे असतात. तसंच इथं बाजारपेठ आहे. त्यामुळे लोकांची वर्दळही नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या लोकांच्या सोयीसाठी सार्वजनिक मुतारी बांधण्यात आली. हा यामागचा खरा उद्देश होता. पण, एका मुतारीसाठी जर इतका मोठा निधी खर्च होत असेल तर विचार करा हे लोक इतर कामांसाठी किती रुपयांचा चुराडा करत असतील.
रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार -खरंतर या जागेवर जी मुतारी होती ती पाडून तिथे व्यवस्थित सुसज्ज अशी मुतारी बांधण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, जुन्या मुतारीच प्लास्टर पडून त्यावर नवे प्लास्टर चढवण्यात आले, त्याला आकर्षक टाइल्स लावण्यात आल्या. पालिकेतून मिळालेल्या अहवालानुसार, इथे जग्वार या कंपनीचे नळ बसवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, इथं एक साधा प्लास्टिकचा नळ आणि एक लोखंडी नळ दिसतो. आता आम्ही आवाज उठवल्यामुळे तात्पुरते काम करतील. पण, आम्हाला ते नको कारण, या मुतारीची पूर्ण ड्रेनेज सिस्टीम दुरुस्त करण्याचे आदेश आहेत. तेव्हा सध्याची इमारत पाडून ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करून नवी मुतारी बांधण्यात यावी. हीच आमची मागणी आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया इथल्या सर्व उपस्थित नागरिकांनी दिली.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आम्ही आमदार दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया घेतली. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही महानगरपालिकेत विचारा. कारण हे काम महानगरपालिकेमार्फत झालेले आहे. लोकांचे काम आहे बोलणे. मात्र, तुमचे जे काही प्रश्न असतील ते महानगरपालिकेत अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना विचारा तेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील, असे आमदार दिलीप लांडे म्हणाले.
हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : पहिल्या मंत्रिमंडळात स्थान नाही, प्रताप सरनाईक नाराज असल्याची चर्चा