मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयांपर्यंत घट झाली आहे. पहा राज्यातील आजचे दर.
TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात एक रुपायांची घट - undefined
आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयांपर्यंत घट झाली आहे. पहा राज्यातील आजचे दर.
![TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात एक रुपायांची घट PETROL DIESEL RATES](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15605466-thumbnail-3x2-op.jpg)
PETROL DIESEL RATES
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल दर -
- मुंबई - आज - 111.35, काल - 111.35
- पुणे - आज - 110.98, काल - 112.02
- नाशिक - आज - 111.45, काल - 111.49
- नागपूर - आज - 111.08, काल - 111.67
- कोल्हापूर - आज - 111.02, काल - 111.02
- औरंगाबाद - आज - 112.97, काल - 111.99
- सोलापूर - आज - 112.03, काल - 111.07
- अमरावती - आज - 112.10, काल - 111.54
- ठाणे - आज - 111.42, काल - 111.49
महाराष्ट्रातील आजचे डिझेल दर -
- मुंबई - आज - 97.28, काल - 97.28
- पुणे - आज - 95.46, काल - 96.46
- नाशिक - आज - 95.92, काल - 95.96
- नागपूर - आज - 95.59, काल - 96.16
- कोल्हापूर - आज - 96.21, काल - 96.09
- औरंगाबाद - आज - 98.89, काल - 96.44
- सोलापूर - आज - 96.49, काल - 95.57
- अमरावती - आज - 96.58, काल - 96.04
- ठाणे - आज - 97.35, काल - 97.42
Last Updated : Jun 20, 2022, 10:43 AM IST