मुंबई - राज्यात बुधवारीदेखील 46 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज देखील कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 406 रुग्ण ( New corona cases in Maharashtra ) सापडले आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 13 हजार 702 बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 36 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे. तर सक्रिय रुग्ण ( Maharashtra Active Corona Case ) देखील 2 लाख 51 हजार 828 इतके आहेत. मात्र, राज्यात ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
2 लाख 51 हजार 828 कोरोना सक्रिय रुग्ण -
राज्यात गेले दोन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला होता. बुधवारी यात वाढ झाली. आज ही 46 हजार 406 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे 70 लाख 81 हजार 067 इतकी झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा आकडा 66 लाख 83 हजार 769 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.39 टक्के इतका आहे. दिवसभरात 36 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2 टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 13 लाख 59 हजार 539 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.92 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 51 हजार 828 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.