महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : आज राज्यात 43 हजार 211 रुग्णांची नोंद, तर 19 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 43 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची ( New corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. तर आज 19 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे.

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update

By

Published : Jan 14, 2022, 9:23 PM IST

Updated : Jan 14, 2022, 10:49 PM IST

मुंबई - राज्यात गुरुवारी 46 हजार 406 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज देखील कोरोना रुग्णांची संख्या 43 हजार 211 रुग्ण ( New corona cases in Maharashtra ) सापडले आहेत. तर आज 19 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे. राज्यात सद्यस्थितीत 2,61,658 सक्रिय रुग्ण ( Maharashtra Active Corona Case ) असून राज्यात आज ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) ओमायक्रोनचा 238 रुग्ण आढळून आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

४३,२११ नवीन रुग्ण -

आज राज्यात 43 हजार 211 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,15,64,070 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 71,24,278 ( 9.96 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज 19 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98% एवढा आहे. राज्यात आज 33,356 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 67,17,125 इतका झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 94.28% एवढे झाले आहे. सध्या राज्यात 19,10, 361 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 92.86 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

238 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद-

राज्यात आज 238 ओमायक्रॉन पॉजिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुणे मनपा येथे 197, पिंपरी चिंचवड येथे 32, पुणे ग्रामीण येथे 3, नवी मुंबई येथे 3, मुंबई येथे 2 तर अकोला येथे 1 रूग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात ओमायक्रॉन एकूण 1605 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 11317
  • ठाणे - 853
  • ठाणे मनपा - 2058
  • नवी मुंबई पालिका - 1746
  • कल्याण डोबिवली पालिका - 1133
  • मीरा भाईंदर - 809
  • वसई विरार पालिका - 980
  • नाशिक - 397
  • नाशिक पालिका - 1516
  • अहमदनगर - 93
  • अहमदनगर पालिका - 675
  • पुणे - 2020
  • पुणे पालिका - 5561
  • पिंपरी चिंचवड पालिका - 2466
  • सातारा - 940
  • नागपूर मनपा - 1398

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - 629
  • पुणे मनपा - 526
  • पिंपरी चिंचवड - 107
  • सांगली - 59
  • नागपूर - 51
  • ठाणे मनपा - 48
  • पुणे ग्रामीण - 44
  • कोल्हापूर, पनवेल - 18
  • सातारा, नवी मुंबई - 13
  • उस्मानाबाद - 11
  • अमरावती - 9
  • कल्याण डोंबिवली - 7
  • बुलढाणा, वसई - विरार - 6
  • भिवंडी मनपा, अकोला- 5
  • नांदेड, औरंगाबाद, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि गोंदिया - 3 प्रत्येकी
  • गडचिरोली, अहमदनगर, लातूर आणि नंदुरबार सोलापूर - 2 प्रत्येकी
  • जालना आणि रायगड - प्रत्येकी 1

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, ११३१७ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू, २२०७३ रुग्णांना डिस्चार्ज

Last Updated : Jan 14, 2022, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details