महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात 1976 रुग्णांना डिस्चार्ज, 1094 नवे रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 1094 नवीन कोरोना रुग्णांचे (New corona patient) निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 20 हजार 423 वर पोहचला आहे. तर आज 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 447 वर पोहचला आहे. आज 1976 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 63 हजार 923 वर पोहचला आहे.

Corona Update
Corona Update

By

Published : Nov 10, 2021, 8:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची (corona) दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982 रुग्ण आढळुन आले होते. आज (बुधवारी) 10 नोव्हेंबरला त्यात वाढ होऊन 1094 रुग्ण आढळून आले आहेत. आज 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 1976 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.


12,410 सक्रिय रुग्ण

आज (बुधवारी) राज्यात 1094 नवीन कोरोना रुग्णांचे (New corona patient) निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 20 हजार 423 वर पोहचला आहे. तर आज 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 447 वर पोहचला आहे. आज 1976 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 63 हजार 923 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 35 लाख 22 हजार 546 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.42 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 29 हजार 714 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 12 हजार 410 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढ उतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17 मृत्यूंची नोंद झाली आहे.

'या' विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 339
अहमदनगर - 86
पुणे - 111
पुणे पालिका - 87

हेही वाचा -रिया चक्रवर्तीचे बँक अकाउंट डीफ्रीज! याचिकेनंतर एनडीपीएस कोर्टाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details