महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BREAKING : दहावी निकाल वेबसाईट हँग प्रकरण : दोषींवर कारवाई करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश - मुंबईमध्ये पावसाला सुरुवात

breaking update
breaking update

By

Published : Jul 16, 2021, 6:26 AM IST

Updated : Jul 16, 2021, 9:09 PM IST

21:07 July 16

दहावी निकाल वेबसाईट हँग प्रकरण : दोषींवर कारवाई करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश

मुंबई -दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ हँग कसे झाले याची चौकशी केली जाईल. वेबसाईट हँग केली असेल तर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर करवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

19:43 July 16

औरंगाबाद येथील व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीची रेड

औरंगाबाद -औरंगाबाद येथील व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीने रेड टाकली आहे. तसेच धुत यांच्या बंगल्यावरही ईडीने रेड टाकली आहे. 

19:30 July 16

राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱयावर

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. कोरोनामुळे मोजक्याच मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत. 

17:36 July 16

गोंदिया; महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, एक महिला ठार

गोंदिया -  महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटल्याने एक महिला ठार झाली आहे. तर  6 जण जखमी झाले आहेत. 

17:21 July 16

पाणी साचणार नाही असे कधी म्हटले नाही - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - सकाळी 4 वाजल्यापासून काही तास मोठा पाऊस पडला. यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. आधी पाणी 5 फूट साचत होते. आता गुडघाभर साचत आहे.  साचलेल्या पाण्याचा काही तासात निचरा होत आहे. आम्ही पाणी साचणार नाही असे कधी म्हटले नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.  तसेच पालिकेने हिंदमाता आदी ठिकाणी पाणी साचू नये म्हणून कामे केली आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत आहे, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.  

17:15 July 16

जळगाव; चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले

जळगाव - जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ रामतलाव परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हा परिसर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी येतो. या घटनेत जीवितहानी झाली आहे, किंवा नाही, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी चोपडा तहसीलदार हे रवाना झाले आहेत. मात्र, या घटनेला अद्याप जिल्हा किंवा पोलीस प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.

16:31 July 16

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना हायकोर्टाची नोटीस

मुंबई - ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. चार्टर प्लेन वापरल्यानंतर त्याचं बिल सरकारी खात्यात का जमा केलं? या प्रश्नाचं उत्तर हायकोर्टानं मागितलं आहे. 

15:27 July 16

पांडुरंगाच्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकरी केशव कोलते दाम्पत्याला संधी

पंढरपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकरी केशव कोलते व इंदुबाई कोलते यांना विठ्ठलाची महापुजा करण्याचा मान मिळाला आहे. केशव कोलते गेल्या वीस वर्षापासून पांडुरंगाच्या मंदिरात विण्याची सेवा देतात. कोलते दाम्पत्य वर्धा जिल्ह्यातील राहणारे आहे. विठुरायाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांसोबत वारकऱ्यांमधील दाम्पत्याचा असतो. मात्र, कोरोनामुळे विण्याची सेवा देणाऱ्या चार विण्यांमधून कोलते यांची निवड मंदिर समितीकडून करण्यात आली आहे.

15:12 July 16

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. अनेक दिवसांपासून अनिल देशमुख हे ईडीच्या रडारवर आहेत. 

12:23 July 16

महाविकास आघाडी सरकार शरद पवारांच्याच नेतृत्वात काम करतेय- प्रफुल पटेल

नागपूर - रोज नाना पटोले काय बोलतात, त्याचं प्रतिउत्तर काय द्यावं हे आम्हाला योग्य वाटत नाही, त्याचं सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार काम करत आहे, सरकारला पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे. पुढेही राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी दिली  

12:20 July 16

टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषणकुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

मुंबई - टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषणकुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

12:10 July 16

महाराष्ट्र आणि केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंता वाढवणारी- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आज 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी ऑनलाईन संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे देखील उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आढावा घेतला. तसेच केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली. आपण सध्या अशा वळणावर पोहोचलो आहोत, जिथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त करण्यात येत आहे. काही राज्यांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची वाढथी संख्या अद्यापही चिंताजनक असल्याचे मोदी म्हणाले. तमिलनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला

12:07 July 16

मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधांन मोदींना दिली कोरोना संदर्भातील माहिती

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांची माहिती, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. 

11:23 July 16

यंदाचा दहावीचा निकाल 99.95 टक्के; कोकण विभागाचा निकाल 100 टक्के

  • दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार दहावीचा निकाल.
  • यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
  • मुलीचा निकाल  99.96% तर  मुलांचा 99.94%
  • 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 957 इतकी आहे..
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के
  • यंदा 15 लाख 75 हजार 806 विद्यार्थी दहावीत होते, त्यातील 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत..एकूण निकालाचा टक्का 99.95 इतका आहे...
  • कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल आहे
  • नागपूर विभागाचा सर्वात कमी 99.84 टक्के निकाल आहे

10:44 July 16

अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचा हृदय विकाराने मृत्यू

सुरेखा सिक्री

मुंबई -प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज हृदय विकाराने निधन झाले. वयाच्या 75 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

10:38 July 16

विरार महामार्गावर दुधाच्या गाडीचा अपघात

विरार महामार्गावर दुधाच्या गाडीचा अपघात, विरुद्ध दिशने येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात गाडी झाली पलटी : दुधाचे नुकसान

--------

09:54 July 16

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस; भात लावणीच्या कामाला वेग

किनारपट्टी भागातील रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात रोपांच्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच आज पालघर जिल्ह्यातही पुढील 3 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

09:15 July 16

मुंबईत पुढील चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फटका बसला आहे. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.

09:10 July 16

मुंबई पाऊस सायन रे्ल्वे स्थानकातील रेल्वेरुळ पाण्याखाली, वाहतूक संथ गतीने

    मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून चाकरमानी रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडले आहेत.
     

    09:01 July 16

    मध्यप्रदेशातील विदिशा येथील दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू; बचावकार्य अद्याप सुरू

    विदिशा येथे घडलेल्या विहीर दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 4 जणांचे मृतदहे हाती लागले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या वारशांना मुख्यमंत्री चव्हाण यांनी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

    08:57 July 16

    मुंबईत पावसामुळे सखल भागात साचले पाणी, बेस्टच्या वाहतूक मार्गात केले बदल

    बेस्टच्या वाहतूक मार्गात केले बदल

    मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. परिणामी याचा वाहतुकीवर परिणाम होत असून बेस्ट बसच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत

    08:53 July 16

    पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम, 25 मिनिट उशिराने धावताहेत लोकल

      मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल धिम्या गतीने चालत असून 20 ते 25 मिनिट उशिराने धावत आहेत. कुर्ला ते विद्याविहार या मार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कक्षातून देण्यात आली आहे.

      07:05 July 16

      मुंबई पाऊस : अंधेरी सबवे वाहतुकीसाठी केला बंद

      अंधेरी सबवे, सायन, गांधी मार्केट, हिंद माता, कुर्ला परिसर पाण्याखाली अंधेरी सबवे वाहतुकीसाठी केला बंद 

      06:49 July 16

      ठाण्यातील कोपरी येथे पूर्व महामार्गावर ट्रक उलटला, एक जखमी

       ठाण्यातील कोपरी येथे पूर्व महामार्गावर ट्रक उलटल्याची घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.  या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

      06:35 July 16

      आज दहावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता १० वी) निकाल आज (१६ जुलै २०२१) दुपारी १ वाजता होणार जाहीर; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली

      06:12 July 16

      आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे

      मुंबई - शहर आणि उपनगरात पावसाने आज पहाटेपासून हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे तर, पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पुढील 24 तासात मुंबईत आणखी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. शहरातील गांधी मार्केट परिसरात पाणी साचायाल सुरुवात झाली आहे. तसेच अद्यापही मुसळधार पाऊस सुरूच आहे. 

      Last Updated : Jul 16, 2021, 9:09 PM IST

      ABOUT THE AUTHOR

      ...view details