महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING LIVE : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला एनसीबीकडून अटक - कोरोना लसीकरण मोहीम

Big News
Big News

By

Published : Jun 23, 2021, 7:59 AM IST

Updated : Jun 23, 2021, 5:55 PM IST

17:53 June 23

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनावर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई - विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात वाढदिवस, उद्घाटने होत असताना अधिवेशन दोन दिवसात गुंडाळण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

17:53 June 23

मुंबईकरांना दिलासा.. मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सर्वपक्षीयांनी फेटाळला

मुंबई - मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सर्वपक्षियांनी फेटाळला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. 14 ते 15 टक्के करवाढीचा हा प्रस्ताव होता. काँग्रेसने सर्वप्रथम करवाढ लागू न करण्याची मागणी केली होती.  काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालमत्ता कर वाढणार नाही याची ग्वाही दिली होती. 

16:02 June 23

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला एनसीबीकडून अटक

मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर याला ठाणे तुरुंगातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेली आहे. जम्मू-काश्मीर येथून मुंबई शहरात चरस या अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इक्‍बाल कासकर यास या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. 

15:16 June 23

प्रशांत किशोर १५ दिवसात तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेेटीसाठी पोहोचले आहेत. आजपर्यंत दोघांमध्ये तीन वेळा भेट झाली असून दिल्लीतील ही दुसरी भेट आहे. दोघांमध्ये सुरु असलेल्या भेटींच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

15:16 June 23

हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत सीबीआयला अनिल देशमुखप्रकरणी कोणतीही कागदपत्रे मागता येणार नाहीत - राज्य सरकार

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. देशमुख यांच्यावतीने जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाईंचा युक्तिवाद सुरू. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी.  केवळ परमबीर यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातीलच नव्हे तर संपूर्ण पोलीस दलातील बदल्यांची फाईल सीबीआयने मागितली आहे. यालाच आमचा विरोध असल्याचे देसाईंचे म्हणणे. कोर्टाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, त्यामुळे सीबीआयने मागच्या दाराने ही माहिती मागताना आपल्या मर्यादेचे उल्लंघन करू नये.  राज्य सरकार, अनिल देशमुखांविरोधात सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातील हे दोन परिच्छेद या प्रकरणाशी संबंधित नाहीत. त्यामुळे ते रद्द करण्याची आमची मागणी. राज्यातील भ्रष्टाचाराचा तपास करण्यास राज्य सरकार समर्थ आहे. आमचीही समांतर चौकशी सुरू आहे. त्यामुळे हायकोर्टाने ही याचिका स्वीकारत सीबीआयच्या एफआयआरमधील हे दोन परिच्छेद वगळण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत. राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण.  हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. निकाल येईपर्यंत सीबीआयला यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे मागता येणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. 

13:10 June 23

आशा वर्कर्सचा संप मिटला; मानधनात वाढ

राज्यातील आशा वर्कर्स यांचा संप संपला,  एक जुलैपासून एक हजार निश्चित मानधन वाढवून देण्यात येणार आहे. तसेच 500 रुपये कोरोना भत्ता देण्यात येणार आहे. असे एकूण 1500 रुपये वाढ मिळणार आहे. 

12:58 June 23

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयनं त्यांच्याविरोधीत दाखल केलेला एफआयआऱ रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अमित देसाई हे युक्तिवाद करत आहेत. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जामदार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सरू आहे

12:39 June 23

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं - चित्रा वाघ

विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे - वाघ

कोरोना बरोबरच हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोरोनाविषयक सर्व नियम पाळून आंदोलन करणार - चित्रा वाघ

12:32 June 23

कोरोना काळात निवडणुका थांबवा - छगन भुजबळ

वारी होत नाही , शाळा बंद आहेत मग सभा घेणार का? कोविड काळात निवडणूक घेणार का? यापूर्वीही गेल्या सरकारमध्ये ओबीसी आरक्षणमध्ये भूमिका घ्या, असे सांगण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला नाही. तेंव्हा कोविड नव्हता मग देवेंद्र फडणवीस सरकारने डेटा का गोळा केला नाही. असा सवाल भुजबळ यांनी फडणवीस यांना केला. भाजप राज्य सरकारने केंद्राकडे डेटा गोळा करण्याच्या मागण्या केल्या. मात्र केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याेच ही ते म्हणाले.

*कोविड काळात निवडणुका थांबवा*  

ओबीसीचे राजकीय आऱक्षण रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यावर कोरोना काळात या निवडणुका थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मंत्रिमंडळात मांडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भात माहिती देण्याची विनंती करावी असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

10:53 June 23

सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते, अराजकता माजवण्यासाठी नव्हे; पटोलेंचा मोदींवर निशाणा

  • वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळली
  • केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे
  • सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते, अराजकता माजवण्यासाठी नव्हे,
  • नाना पटोलेंनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले
  • ओबीसी आरक्षण हटविण्याचे पाप हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे आहे.
  • फडणवीस आता जनतेची दिशाभूल करत आहेत, ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील

10:51 June 23

स्वबळावर निवडणुका लढवण्यावर काँग्रेस ठाम; आता माघार नाही - पटोले

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

-फैजपुरात प्रेरणा स्तंभाला अभिवादन करत नाना पटोलेंनी स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांच्या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी पटोले यांनी आदिवासी बांधवांसोबत ठेका धरला होता. आमदार प्रणिती शिंदे, शिरीष चौधरी हे यावेळी उपस्थित होते.

10:49 June 23

नवी कृषी कायद्याने शेतकरी रस्त्यावर येईल; सरकार विरोधात रान पेटवणार - पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या मसुद्याची केली होळी यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • नवीन कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग रस्त्यावर येणार
  • यापुढच्या काळात भाजप सरकार विरोधात रान पेटवणार, पटोलेंची घोषणा

06:14 June 23

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्राने मंगळवारी उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ५ लाख ६० हजार जणांचे लसीकरण करण्यात आले.  राज्यात आतापर्यंत एकूण 2 कोटी 87 लाख जणांना लस देण्यात आली आहे.

Last Updated : Jun 23, 2021, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details