मुंबई -राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात किंचित वाढ होऊन ६६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊन ५७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज रविवारी त्यात आणखी घट होऊन ४७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. काल शनिवारी मृत्यू संख्येत आणखी घट होऊन १३४ मृत्यूची नोंद झाली. आज रविवारी त्यात किंचित घट होऊन १३० मृत्यूची नोंद झाली आहे.
३७१० रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात गुरुवारी ३,७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८९,९३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ४,७९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३५,०३९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०९,५९,७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९२,६६० (१२.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५९,६४२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,२१९ सक्रिय रुग्ण आहेत.