महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शुक्रवारी राज्यात ८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद - CORONA IN MAHARASHTRA

महाराष्ट्र
बिग ब्रेकिंग

By

Published : Jul 9, 2021, 8:57 AM IST

Updated : Jul 9, 2021, 10:29 PM IST

22:27 July 09

शुक्रवारी राज्यात ८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई -राज्यातील कोरोना मृतांचा आकडा अद्याप नियंत्रणात येताना दिसत नाही. शुक्रवारी राज्यात तब्बल २०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा मृत्यूदर २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत मृतांचा आकडा आता १ लाख २५ हजार ०३४ इतका झाला आहे. शुक्रवारी राज्यात ८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ वर गेली आहे.

22:00 July 09

आर विमला नागपूरच्या नवीन जिल्हाधिकारी

नागपूर -  नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची बदली करण्यात आली आहे. अद्याप त्यांना पोस्टिंग दिलेली नाही. आर विमला यांची नागपूरच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २००९ बॅचच्या प्रशासकीय अधिकारी आहेत. याचबरोबर नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची धुळे जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. 

21:53 July 09

मुंबई; माजी महापालिका आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन

मुंबई -माजी महापालिका आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन झाले आहे. पूजा करताना लुंगीला आग लागल्याने ते जखमी झाले होते. आज मसिना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.    

21:47 July 09

राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई -राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

19:44 July 09

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमली तीन सदस्यांची समिती

मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती नेमली आहे. २०१५ ते २०१९ काळातील फोन टॅपिंग ही समिती तपासणार आहे. येत्या तीन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत. 

18:50 July 09

पाच जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई -  पाच  जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 19 जुलैला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार होत्या. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास सांगितले होते. राज्यात असलेली कोविड परिस्थितीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली होती. तसेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.  

17:23 July 09

साईबाबा संस्थानच्या साई प्रसादलयातील आचाऱ्याची आत्महत्या

शिर्डी -साईबाबा संस्थानच्या साई प्रसादलयातील आचाऱ्याने आत्महत्या केली आहे. दिलीप सांबरे असे या आत्महत्या केलेल्या आचाऱ्याचे नाव आहे. शिर्डीतील पुनमनगर येथील ते रहिवासी आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या  केली. कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट आढळली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

16:33 July 09

गोरेगाव; इमारतीच्या सिलिंगचे प्लास्टर पडून लहान मुलाचा मृत्यू

मुंबई - गेल्या 24 तासात पडलेल्या पावसादरम्यान गोरेगाव पश्चिम येथे एका इमारतीमधील घराचे सिलिंगचे प्लास्टर कोसळले. यात आई आणि मुलगा जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, लहान मुलाचा सकाळी मृत्यू झाला असून, आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

16:07 July 09

लोकशाहीला कुलूप लावण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करतंय - देवेंद्र फडणवीस

पुणे - अधिवेशनात ज्या प्रकारे एकतर्फी कारभार सरकारने चालवला, अतिशय कपोलकल्पित आरोप लावून आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले, यातूनच राज्य सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतोय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

अधिवेशन आले की डेल्टा येतो, अधिवेशनात हा प्रश्न गंभीर होतो. अधिवेशन संपलं की ही चर्चा बंद होते. लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम या सरकारने केलं, त्याला विरोध केला असता आमच्या 12 आमदारांना निलंबित केले, असे फडणवीस म्हणाले.

15:36 July 09

पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश बरबाद होतोय - नाना पटोले

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश बरबाद होत आहे. देशाची संपत्ती विकली जातेय..नवीन कृषी धोरण आणून शेतकऱ्यांना देखील बरबाद करण्याचे धोरण केंद्राने आखले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.  

राहुल गांधींनी नोटबंदी आणि जीएसटी धोरणाचा प्रखर विरोध केला होता. तेव्हा केंद्र सरकारमधल्या लोकांनी राहुल गांधी यांची थट्टा उडवली होती. तेव्हाच जर राहुल गांधी यांना गांभीर्याने घेतले असते तर ही परिस्थिती आली नसती, असेही पटोले म्हणाले. तसेच ज्यांना सहकाराचा एबीसीडी माहिती नाही असे लोकं सध्या केंद्रात बसले आहेत. सहकारावरून केंद्र सरकारच्या मनात काय आहे ते आताच सांगता येणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले. 

13:18 July 09

मोदींसह भाजपावर होणाऱ्या टीका थांबवण्यासाठीच ट्विटरवर कारवाईच्या हालचाली- नवाब मलिक

जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत. त्यामुळेच ते कसे थांबवावे यासाठी केंद्र सरकारच्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

13:14 July 09

आम्ही पक्षावर नाराज नाही; भाजपाचा निर्णय आम्हाला मान्य- पंकजा मुंडे

आम्ही पक्षावर नाराज नाही; भाजपाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना स्थान न मिळाल्यामुळे त्या नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात होत्या. तसेच कार्यकर्त्यांमधूनही मुंडे यांना डावलल्याने नाराजी होती. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या निर्णयावर आम्ही बहिणी नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

12:27 July 09

प्रकाश आंबेडकरांची बायपास सर्जरी; सध्या ICU मध्ये भरती


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल., त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल,अशी माहिती पक्षाच्या प्रभारी रेखा ठाकूर यांनी दिली

11:37 July 09

शंभर करोड वसुली प्रकरण : ED आज सचिन वाजे याचा नोंदवणार जबाब

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अधिकाऱ्यांना १०० कोटीची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता. त्याप्रकरणात आज ई़डी ED आज सचिन वाजे याचा  जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता



तळोजा कारागृहात जाऊन नोंदवणार सचिन वाजेचा जबाब

मुंबई PMLA कोर्टाने दिली ED ला जबाब नोंदवण्याची परवानगी

सचिन वाजेच्या स्टेटमेंट मध्ये अन्य मंत्र्यांची देखील नाव येण्याची दाट शक्यता

10:49 July 09

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समिती नोंदवणार शरद पवारांचा जबाब

कोरेगाव भीमा एल्गार परिषद दंगल प्रकरणात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवणार आहे. २ ऑगस्ट पासून यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती चौकशी समितीचे वकील आशिष सातपुते यांनी दिली.

10:32 July 09

वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

ठाणे येथे वाहतूक पोलिसाशी उद्धटपणे बोलत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये नोपार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या कारवर कारवाई केल्याने कारचा मालक वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत आहे. तसेच वर्दी उतरवून समोर आल्यास दोन हात करतो अशा प्रकारेच वक्तव्य केल्याचे व्हिडिओतून समोर आले होते. 

09:56 July 09

मुंबईतील बीकेसी येथील जंबो कोविड सेंटरवरील लसीकरण लसींचा तुटवडा असल्याने बंद

09:41 July 09

तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध; चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा

संजयजी राऊत यांनी स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून भाजपाच्या महिला प्रदेशा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.  संजय राऊत तुम्ही स्मृती इराणी यांच्या बद्दल जे बरळलात… त्याचा मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन, अशी शब्दात वाघ यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे. तसेच आरेला कारे करण्याची धमक आमच्यातही असल्याचाही इशारा त्यांनी राऊत यांना दिला आहे.

08:50 July 09

पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू; तपास सीबीआयकडे

पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचे मृत्यू झाला होता. या प्रकरणी मारहाणीचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस कर्मचारी नामदेव चरडे व आकाश शहाणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच ठवकर यांचा मृत्यू ते पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने नियमानुसार या प्रकरणाचा तपास CID कडे दिला गेला आहे.

07:06 July 09

कळमेश्वरमधील एका नाल्याला पूर आल्याने दोन व्यक्ती दुचाकीसह वाहून गेले. एसडीआरएफकडून शोधमोहीम सुरू

नागपूर - गुरुवारी नागपुरला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे सखल भागातील रस्त्याकडेच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक वर्षी या रहिवाश्यांना घरात पाणी घुसण्याच्या समस्येला सामारो जावे लागते, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. 

Last Updated : Jul 9, 2021, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details