मुंबई - डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. जवळपास 293 किलो हेरोइन ड्रग जप्त केले आहे. हे ड्रग अफगानी हेरोइन असल्याची माहिती मिळत आहे. सदर ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 2 हजार कोटी रुपये किंमत आहे. या प्रकरणात पुढील कारवाई शुरू असून, आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईत 2 हजार कोटींचे ड्रग्स जप्त
20:22 July 05
डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईत 2 हजार कोटींचे ड्रग्स जप्त
18:47 July 05
नागपूरच्या जरीपटका हद्दीतील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा
नागपूर -नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. सोने चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या ज्वेलरीच्या दुकानात दरोडा टाकून आरोपींनी सोने, चांदीच्या दागिनांसह रोख रक्कम लुटली आहे. दरोडेखोरांनी दुकान मालकाला बंदुकीच्या धाकावर बंधक बनवून लूट केली आहे, एवढंच नाही तर आरोपींनी दुकानदाराला मारहाणसुद्धा केली आहे. दरोडेखोरांनी 4 लाख रुपये कॅश आणि सोने चांदीचे दागिने लुटले आहे. यात चार आरोपींचा समावेश असून, एकाजवळ बंदुक होती.
17:33 July 05
राज्यातील आठवी ते बारावीच्या शाळा होणार सुरू
मुंबई - इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
13:14 July 05
भाजपाच्या मित्राने पाठीकडे सतत लक्ष ठेवावे; खंजीर खुपसला जाईल - सचिन सावंत
भाजपाची तथाकथित मैत्री जास्त घातक आहे. मित्रांना स्वतः च्या पाठीकडे सतत लक्ष ठेवावे लागते. कधी खंजीर खुपसला जाईल याचा नेम नाही. सूज्ञांना हे कळलं म्हणून एनडीएतून अनेकांनी काढता पाय घेतला आहे, असा सल्ला शिवसेनेला देत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
13:04 July 05
नंदुरबार : उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा भाजपात प्रवेश
नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजप मध्ये प्रवेश.
भाजपाकडून मांडळ गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. एैन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का....
13:02 July 05
केंद्राकडून ओबीसीचा इम्पेरीयल डेटा मिळविण्याच्या मुद्द्याचा ठराव संमत
केंद्राकडून ओबीसीचा इम्पेरीयल डेटा मिळविण्याच्या मुद्द्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. आवाजी मतदान हा ठराव संमत करण्यात आला आहे.
13:00 July 05
ओबीसी आरक्षणासाठी सत्ता कशाला हवी?
ओबीसी आरक्षणासाठी सत्ता कशाला हवी? तुम्ही आरक्षण मिळवून द्या, श्रेय तुमचंच आहे. अशा शब्दात मंत्री छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले.
12:46 July 05
केंद्राने वटहुकूम काढावा, आरक्षणासाठी उगाच मराठ्यांना रस्त्यावर आणू नका - संभाजीराजे छत्रपती
नागपूर - मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुरातील मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. त्यावेळ त्यांनी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा आणि आरक्षण देण्याची तरतूद करावी, उगाच लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशारा दिला.
संभाजीराजे म्हणाले, मराठा समाज किती दुःखी आणि व्यथीत झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी अनेक नेत्यांना भेटलो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर, नाशिकला मुक आंदोलन झाले. त्यानंतर सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मकता दाखवल्याने मुक आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर हा संवाद दौरा सुरु केला आहे. मात्र नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या पर्यायावर बोलायला हवे. अधिवेशन सुरु झाले आहे, सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी काही मुद्दे अधिवेशनात मांडावेत असे मी काही सुचीतच केले आहे.
आरक्षणासाठी पहिला पर्याय होता पुनर्विचार याचिका, दुसरा टप्पा क्युरीटी पिटीशनचा होता. पुढचा स्टेप राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करुन मराठा समाजा मागास आहे याबाबत सर्वे करावा लागेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्याला अधिकार नाहीत, ते केंद्राकडे आहेत केंद्राने वटहुकूम काढावा, उगच लोकांना रस्त्यावर काढू नका असेही ते म्हणाले. तसेच सरकारचे प्रतिनिधी तोंडी सर्व मान्य करतात,मात्र कागदावर ते मान्य करत नाहीत असेही संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले.
- परीक्षा पास झालेल्या मुलांच्या नियुक्त्या तात्काळ करा,यात मुलांची काय चूक तात्काळ त्यांचे समाधान करा ..विशेष बाब म्ह्णून नियुक्त्या द्या
- वसतिगृह सुरू करा...ओबीसी समाजच्या सुविधा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना द्या
- मराठा समाजातील लोकांवर असलेले गुन्हे मागे घ्या...
- ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत ,ते सुद्धा सरकार करत नाही
- महिना संपत आलेला आहे,त्वरित प्रश्न मार्गी लागले नाही तर आमच्या कडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही
- कुणाच्या चुका काढण्यापेक्षा मार्ग काढावा
- आम्हाला नक्षल वाद्यांना सांगायचं आहे... तुम्ही मुख्य प्रवाहात या... नक्षलवादी म्ह्णून आम्हाला तुमची मदत नको
- सर्वपक्षीय प्रतिनिनींनी पंतप्रधानांची भेट घेऊ
12:22 July 05
आम्ही काय भारत पाकिस्तान नाही- संजय राऊत
आम्ही काय भारत पाकिस्तान नाही; ज्या प्रमाणे अमिर खान आणि किरन राव त्याप्रमाणेच शिवसेना भाजप आहे. राजकीय मार्ग वेगळा आणि मैत्री अद्याप कायम आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या शिवसेनेसोबत शत्रूत्व नसल्याच्या भूमिकेवर दिली आहे.
12:22 July 05
आमच्या शत्रूत्व नसले तरी; आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करू असे नाही - चंद्रकांत पाटील
फडणवीस यांनी भाजपा आणि शिवसेनेमध्ये शत्रूत्व नसल्याचे वक्तव्य केले आहे. ते १०० टक्के खरे आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की आम्ही एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
12:21 July 05
भागवत यांचे मत परिवर्तन होत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो - राष्ट्रवादी
मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांचा डिएनए एकच आहे. जर भागवत यांचे मत परिवर्तन होत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारी संघटना जर धर्माच्या सीमा तोडू इच्छीत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
12:11 July 05
सरकारला शरम असेल तर 50 लाख रुपये स्वप्नीलच्या कुटुंबाला द्या - मुनगंटीवार
एमपीएसी च्या रिक्त जागा भरती प्रकरणावरून लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्यानंतर 430 विद्यार्थ्यांनी आम्ही सुद्धा आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. रविवारपासून 100 च्यावर विद्यार्थ्यांनी आम्हाला फोन करून हा विषय मांडा अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. तसेच निवृत्ती झालेल्या अधिकाऱ्याना आपण आपण मुदतवाढ देतो पण स्वप्नील सारखं विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल करत 50 लाख रुपये स्वप्नीलच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. सरकारचा निर्णय घेण्याचा आंधळेपणासाठी स्पेशालिस्ट शोधायला हवा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
12:10 July 05
आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली पण स्वायत्तता म्हणजे सैराचार नाही - देवेंडे फडणवीस
एमपीएससीची जी आहे त्याचे परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. एमपीएससी असे झाले आहे की, कुणाला काही देणेघेणे नाही. आमच्या तरुणाईचा जीव महत्वाचा आहे. यापुढे एकही स्वप्नील लोणकरचा जीव जाणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिली.
11:56 July 05
महाबीजने शेतकऱ्यांची फसवणूक केली; याची चौकशी करा - आमदार रवीराणा
मुंबई - राज्यात सध्य स्थितीत पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यातच महाबीजने लोकांची फसवणूक केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. सरकारला शेतकरी,मराठा,ओबोसी समाजाचे काहीही पडलेले नाही, अशी टीका आमदार रवीराणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यावेळी आमदार राणा यांनी अधिवेशनाची कामकाज पत्रिका फाडून सरकारचान निषेध व्यक्त केला.
11:52 July 05
अनिल देशमुख ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत; पाठवले पत्र
11:39 July 05
३१ जुलेैपर्यंत एमपीएसीच्या जागा भरणार; अजित पवारांची विधानसभेत माहिती
31 जुलै 2021 पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरल्या जातील. स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर आज सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. राज्यातील तरुण तरुणींना सांगू इच्छित आहोत नोकर भरतीसाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. लोणकर याच्या आत्महत्येसारखीघटना कोणाचाही सरकार असलं तरी घडता कामा नये, लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
स्वप्नील लोणकर या तरुणाने 2019 मध्ये अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली. मुख्य परीक्षा जुलै 2020 मध्ये तो पात्र ठरला होता. दरम्यान SEBC आरक्षणास 9 सप्टेंबर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने संबंधित प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे मुलाखती झाल्या नाहीत. त्यामुळे स्वप्नील नाउमेद झाला असेल. मात्र या प्रकरणावर कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आणि 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या भरून टाकू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली.
11:17 July 05
मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहेत? , नाना पटोलेंचा सवाल
हरकतीचा मुद्दा मांडताना सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ… मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहेत? , नाना पटोलेंचा सवाल
10:34 July 05
ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण- फडणवीस
ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने जनगणनेची आकडेवारी मागितली नाही. मात्र, सरकार राजकारण करत असेल तर आम्ही ओबीसी समाजासोबत राहू असेही फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधकांनी विधानभवानाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
10:18 July 05
आमचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कोरोना काळात काही जणांचा बळी गेलाय. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधिल आहोत आणि आम्ही तसा प्रस्ताव सभागृहात मांडणार असल्याचे मंत्री नितीन राऊत यांनी विधानभवना बाहेर बोलताना सांगितले.
10:04 July 05
तोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही; नितीन राऊत
पावसाळी अधिवेशानामध्ये आम्ही असा प्रस्ताव मांडू की केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी गोळा केलेला इंपेरिकल डाटा राज्यांना उपलब्ध करून द्यावा. जो अद्यापही राज्यांना देण्यात आलेला नाही. जोपर्यंत तो डाटा मिळणार नाही पर्यंत ओबीसी आरक्षण देता येणार नाही.
09:50 July 05
दहिसर गोळीबार प्रकरणी सात आरोपींना अटक; मास्टरमाईंडच्या मध्यप्रदेशात आळल्या मुसक्या
मुंबई - दहिसरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुख्य मास्टरमाइंड बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदारास अटक केली आहे. या दोघांना मध्यप्रदेशातून अटक कऱण्यात आले आहे. या गोळीबार प्रकरणी यापूर्वी 1 जुलैला 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण अटक करण्यात आलेल्यांची संख्या ७ झाली आहे. दरोडा टाकण्याच्या हेतून 30 जूनला दहिसरमधील एका सराफा दुकानावर गोळीबार करण्यात आला होता. यात दुकान मालकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सोने चोरी करून आरोपी फरार झाले होते.
09:45 July 05
आरएसएस सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे; काँग्रेस नेते नितीन राऊतांची टीका
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संचालक मोहन भागवत यांनी हिंदू मुस्लीम एकत्र आहेत, असे विधान केले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहे. मात्र, ज्यावेळी गोमांस प्रकरणावरून काही जणांची झुंडशाहीने हत्या केली. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत का बोलले नाहीत. देशात पाच राज्याच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भागवत यांचे हे भाष्य आहे. आरएसएस आता सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे, लोकांनी सावध व्हावे, अशीे टीका राऊत यांनी केली आहे.
09:13 July 05
मुंबईत आज पेट्रोल 105.92 रुपये प्रति लीटर
मुंबईत आज पेट्रोल 105.92 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझल 96.91 रुपये प्रति लीटर रुपयांवर पोहोचले आहे
09:10 July 05
वसईत समुद्र किनारी बुडून दोन मुलांचा मृत्यू
पालघर- वसई परिसरात रविवारी समुद्रातून बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचे वय 13 आणि दुसऱ्या मुलाचे वय 20 होते. दोघेही समुद्र किनारी खेळत असताना, लाटेत वाहून गेले. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
08:31 July 05
मुस्लीम आरक्षणाबाबत मोर्चाला परवानगी नाकारली, तरीही मोर्चा काढण्यावर ठाम
मुंबई - रजा अकादमी आणि वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम आरक्षण आणि धार्मिक प्रतिकांच्या अवमानना विरोधी कायद्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिलसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे. आझाद मैदानात मोर्चेकरी जमा होणार आहेत.
06:01 July 05
दोन दिवसीय अधिवेशनाचा पहिला दिवस
मुंबई - आज विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्नासह राज्यातील कोरोना महामारी, खरीप हंगाम, महागाई या प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर या अधिवेशनात केंद्रीय कृषी कायद्या विरोधात ठराव पारित करण्यात येण्याची शक्यता आहे.