महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस, जरंडेश्वर कर्ज प्रकरणाची होणार चौकशी - राजकीय घडामोडी

महाराष्ट्र बिग ब्रेकिंग
महाराष्ट्र

By

Published : Jul 10, 2021, 6:56 AM IST

Updated : Jul 10, 2021, 9:58 PM IST

21:57 July 10

रायगड - वर्षा पर्यटनासाठी मुंबईहून आलेली तीन अल्पवयीन मुले कर्जतजवळील धरणात बुडाली

रायगड -रायगडमध्ये  पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जत जवळील डिकसळ येथे ही घटना घडली. तिघेही अल्पवयीन कुर्ला येथून हे पाली भूतवली धरणावर पोहण्यासाठी आले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. मृतांमध्ये साहील हिरालाल त्रिभुके (वय- १५ वर्षे), प्रीतम गौतम साहू ( वय -१२ वर्षे), मोहन साहू (वय -१६ वर्षे) या तिघांचा समावेश असून हे तिघेही कुर्ला नौपाडा, नानीबाई चाळ येथील आहेत. 

20:30 July 10

राज्यात मृत्यदर वाढला.. १७९ जणांचा मृत्यू आठ हजार २९६ नवे कोरोनाबाधित

मुंबई - राज्यात आज ८, २९६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून राज्यभरात आज १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे.

18:27 July 10

'जरंडेश्वर' प्रश्नी ईडीची सातारा जिल्हा बँकेला नोटीस

सातारा -अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला 'जरंडेश्वर कारखाना'प्रश्नी नोटीस काढली आहे. या नोटीसीमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कोरेगाव जवळचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खासगीत तत्वावर खरेदी करताना संबंधितांना ९६ कोटी रुपयांचे कर्ज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिले होते. हे कर्ज कशाच्या आधारे दिले. त्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ईडीने बँकेला दिले असल्याचे सांगण्यात येते. बँकेतील अधिका-यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला.

18:26 July 10

अवैद्य दारु-मटका जुगारावर लातूर पोलिसांची धडक कारवाई, साडे लाखांची मुद्देमाल हस्तगत

लातूर -लातूर पोलिसांनी अवैध दारू-मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली. 147 आरोपींसह 8 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत 134 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

18:23 July 10

भाजप परळी तालुकाध्यक्ष सतिष मुंडेंचा राजीनामा

बीड - खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना मंत्रिमंडळात जाणीवपूर्वक डावलण्याने पंकडा मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे भाजप परळी तालुकाध्यक्ष सतीष मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

17:38 July 10

नऊ वर्षाच्या वैमनस्याचा खुनाने शेवट.. हत्येसाठी चार लाखांची सुपारी

अहमदनगर - शिर्डीत दहा दिवसापूर्वी झालेल्या राजेंद्र धिवर यांच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. शिर्डीतील कालिकानगर परिसरात राहणाऱ्या अमोल लोंढे याने पूर्ववैमन्यसातून राजेंद्र धिवर यांच्या खुनासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही सुपारी त्याने नाशिकच्या गुन्हेगारांना दिली होती. नाशिक आणि नगरच्या पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये आठ आरोपींचा समावेश होता. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील दोन आणि शिर्डीतील दोन आरोपींना अटक केली आहे.  

17:38 July 10

गुरुपौर्णिमेला शिर्डीतील साई मंदिर राहणार बंद

शिर्डी - देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या कोविड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 5 एप्रिल 2021 रोजी पासून पुढील आदेशापर्यंत साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आले आहे.  कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी दिनांक 22 जुलै ते 24 जुलै 2021 या कालावधीत येत असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍तही मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. 

16:21 July 10

८२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह तिघांना अटक, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर - 82 ग्रॅम 84 मिली ग्रॅम एमडी ड्रग्स पावडरसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. एमडी ड्रग्सची किंमत 8,28,400 रुपये  इतकी असून याशिवाय मोबाईल फोन आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमाल हा ११ लाख ५५ हजार रुपयांचा झाला आहे

16:21 July 10

युट्युबवर चोरीचे व्हिडिओ पाहून चेन स्नॅचिग करणाऱ्या आरोपीला बेड्या

पिंपरी-चिंचवडमध्ये युट्युबवर चोरीचे व्हिडिओ पाहून चेन स्नॅचिग करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्य़ात आल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

15:08 July 10

शिवसेनेने मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये - आमदार भास्कर जाधव

रत्नागिरी -नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना प्रवक्ते तसेच आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना वाटतंय की भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करू शकतील. असे तिन्ही पक्षांचे मत आहे. तशा प्रकारची अनऑफिशियल चर्चा देखील झाली. पण मी ठामपणे सांगतो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्रीपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मताशी मी ठाम असल्याचे जाधव यावेळी म्हणाले. 

13:38 July 10

फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी समिती तीन महिन्यात अहवाल सादर करेल - मलिक

महाराष्ट्र विधानसभामध्ये अवैध फोन टॅपिंगचे प्रकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता, की पुणे पोलीस आयुक्त बेकायदेशीरपणे महाराष्ट्रातील राजकीय लोकांचे फोन टॅप करत होत्या.  गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, याची चौकशी होईल. राज्याचे  DGP आणि अन्य अधिकाऱ्यांची समिती याची चौकशी करणार आहे, ती समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर सरकारकडून कारवाई केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

13:05 July 10

नागपुरात कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना आणि विकास कामांना गती देणार - जिल्हाधिकारी आर. विमला

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविणे आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. 

13:01 July 10

१२ आमदारांचे निलंबन प्रकरणी भाजपाचे मुंबईत आंदोलन

भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्या प्रकरणी मुंबईत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ओबीसींंना तत्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी देखील केली.

11:12 July 10

यवतमाळ : वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू; जामनी परिसरात घडली घटना

09:52 July 10

पुणे बंगळुरू महामार्गावर अनियंत्रित ट्रकची ८ वाहनांना धडक; जीवितहानी नाही

पुणे शहरातील पुणे बंगळुरू या महामार्गावर असलेल्या नवले पुलावर एक विचित्र अपघात घडला. एका अनियंत्रित झालेल्या ट्रकने तब्बल आट वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

09:28 July 10

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे धुळे दौऱ्यावर, पीक पाहणी करून सोंडले गावात शेतकऱ्यांशी चर्चा

08:48 July 10

नाशिक आरटीओ कार्यालयासमोर दोन ट्रकचा भीषण अपघात; ४ जण जखमी, २ अत्यवस्थ

07:09 July 10

२०२४ पर्यंत ६० हजार किमी जागतिक दर्जाचे महामार्ग बनविण्याचे माझे उदिष्ट - गडकरी

२०२४ पर्यंत ६० हजार किमी जागतिक दर्जाचे महामार्ग बनविण्याचे माझे उदिष्ट आहे. प्रति दिवसाला ४० किमी या वेगाने हे रस्ते निर्मितीचा काम पूण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. भारतात सध्या 63 लाख किमी रस्त्याचे जाळे पसरले आहे. जगात दुसऱ्या क्रमांचे सर्वाधिक रस्त्यांचे जाळे असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. रस्ते निर्मिती ही भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

07:04 July 10

इंधन दरवाढ सुरूच; मुंबईत पेट्रोल 109.24 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 98.67 रुपयांवर

06:41 July 10

मुंबई पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास पावसाचा अंंदाज

 मुंबई पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास पावसाचा अंंदाज

06:26 July 10

घराच्या छताचे प्लास्टर कोसळून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू; आई जखमी

 मुंबई - गोरेगावमध्ये एका घराच्या छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई जखमी झाली आहे. महिलेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

06:22 July 10

इंधनाच्या करातून केंद्राला ४ लाख कोटी रुपये मिळताहेत - अजित पवार

केंद्र सरकार सुमारे साडे तीन लाख ते ४ लाख कोटी रुपये इंधनाच्या करातून मिळवत आहे. त्यांनी मन मोठ करून करात कपात करावी, असे स्पष्ट मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंधन दरवाढीवर बोलताना व्यक्त केले आहे. तसेच राज्यात आम्ही कोणत्याही प्रकारचे कर वाढवलेले नाहीत, जे आहेत ते भाजपाची सत्ता असतानाचा वाढवण्यात आलेले असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jul 10, 2021, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details