महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking : कुरिअरमार्फत तब्बल ४९ तलवारींची ऑर्डर, औरंगाबादमधून एकाला अटक - महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज

big breking
big breking

By

Published : Jul 4, 2021, 3:09 PM IST

Updated : Jul 4, 2021, 10:26 PM IST

22:26 July 04

Assembly Monsoon Session : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकार मांडणार 'ही' ७ विधेयके

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी ५ जुलै आणि ६ जुलै २०२१ असे दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसात ठाकरे सरकारकडून ५ नवी विधेयके तर २ प्रलंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.

21:43 July 04

अधिवेशनाच्या पूर्वसंध्ये चहापान रद्द, तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद टाळली

मुंबई -  प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक आणि सत्ताधारी चहापान करत अधिवेशनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र सध्या राज्यात असलेल्या वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. तर तिथेच अधिवेशनात मांडले जाणारे ठराव तसेच महत्त्वाच्या विधेयक याबाबत माहिती देण्यासाठी घेतली जाणारी पत्रकार परिषदेही यावेळी मुख्यमंत्र्यांकडून टाळण्यात आली आहे.

20:44 July 04

औरंगाबादमध्ये प्लायवूडच्या दुकानाला भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

औरंगाबाद -सिडको N-6 येथील आझाद चौकतील प्लायवूडच्या दुकानाला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

20:13 July 04

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाचे प्रश्न एका तासात निकाली लागू शकतात - संभाजी राजे

प्रतिक्रिया देताना संभाजीराजे

अकोला - मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागु शकतात दोन दिवसांचे अधिवेशन आहे. मात्र, आम्हाला चर्चा नको डीबेट नको त्यामुळे पर्याय शोधा, असे वक्तव्य संभाजी महाराज यांनी आज अकोला येथील संवाद बैठकीत केले. 

19:42 July 04

बंदी झुगारून सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश.. पुन्हा एकदा एक मराठा ! लाख मराठा !

सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश..

सोलापूर  -मराठा क्रांती मोर्चात हजारोंच्या जनसमुदायाने सहभाग घेतला होता. पोलीस परवानगी नसतानाही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव, तरुण, तरुणी व महिलांचा मोठा सहभाग होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत एक मराठा ! लाख मराठा आवाजाने सोलापूर शहर व परिसर दुमदुमून गेला होता. आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्क आहे, शासन कोणत्याही प्रकारची मेहरबानी करत नाही, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. बंदी झुगारून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आक्रोश मोर्चा सुरू झाला आणि पायी जात पार्क चौक येथे समाप्त झाला. पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.

17:11 July 04

४९ तलवारींची ऑर्डर देणाऱ्या एकाला अटक, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद - तब्बल ४९ तलवारी कुरिअरमार्फत मागवणाऱ्या एकाला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. भाड्याने देण्याच्या उद्देश्याने या तलवारी मागवल्याचे आरोपीने म्हटले आहे. घटनेचा तपास सुरू आहे. डीसीपी दिपक घिरे यांनी ही माहिती दिली.  

17:10 July 04

सोलापुरात मराठा क्रांती मार्चाचा आक्रोश मोर्चा.. कर्नाटक महामंडळाच्या बसवर दगडफेक

कर्नाटक महामंडळाच्या बसवर दगडफेक

सोलापूर - मराठा आरक्षणासाठी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलकांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. सोलापूर शहरातील सात रस्ता येथे कर्नाटक बसवर अचानकपणे दगडफेक करण्यात आली. बसमध्ये काही प्रवाशी होते. त्यांना कसल्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती वाहक आणि चालक यांनी दिली आहे. दगडफेक कोणी केली, का केली याचा पोलीस तपास सुरू आहे.

15:42 July 04

सोलापूर जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चा.. अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष

सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा..

पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर येथील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रोश मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून भाजप आमदार व कार्यकर्ते जात असताना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये मंगळवेढातून आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तर टेंभुर्णी येथून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना ग्रामीण पोलिसांनी रोखले. त्यामुळे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी आमदारांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

15:08 July 04

18 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला.. कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीतून स्पष्ट

मुंबई -भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीनची लहान मुलांसाठीची क्लिनिकल चाचणी नागपुरात सुरु असून चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात तब्ब्ल 18 टक्के मुलांच्या शरीरात आधीच अँटीबॉडी आढळून आले आहे. त्यामुळे 100 पैकी 18 मुले आधीच कोरोनाबाधित होऊन बरे झाली आहेत. याची त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्याची कल्पना नसल्याचे समोर आले आहे..

14:54 July 04

युवा पिढी नैराश्यात; एमपीएसीच्या परीक्षा लवकर घ्या- आमदार रोहित पवार

12:43 July 04

महाविकास आघाडी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधावर ठाम - नवाब मलिक

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भूमिका केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात आहे. महाविकास आघाडीचा आजही त्या कायद्यांविरोधात ठाम आहे. आम्ही विधानसभेत प्रस्ताव पारित करत या कायद्याला विरोध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली 

12:03 July 04

युवा पिढी नैराश्यात; एमपीएसीच्या परीक्षा लवकर घ्या- आमदार रोहित पवार

कोरोनामुळं स्थगित केलेली एमपीएसीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी सरकारला केली आहे.

09:18 July 04

पंढरपूर -भंटुमबरे येथे पाण्याच्या हौदात पडल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

08:19 July 04

सोलापूर शहरात येणारे सर्व रस्ते बंद; ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.मोर्चा परवानगी नाकारण्यात आली असताना देखील मराठा समाज बांधव मोर्च्यावर ठाम आहेत. त्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

07:17 July 04

नाशिकच्या सरकारी रुग्णालयात सहा महिन्यात ३००० महिलांची प्रसुती

कोरोना महामारीच्या मागील सहा महिन्यात नाशिक येथील सिव्हील रुग्णालायत तब्बल 3000 पेक्षा जास्त महिलांची प्रसुती करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने कोरोना बाधित आणि सर्व सामान्य गर्भवती महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. या कामगिरीमागे प्रसुती तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांचे कष्ट असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

06:47 July 04

पालघरच्या बोईसर-तारापूर एमआयडीसीमधील भारत केमीकल कंपनीत स्फोट

पालघर जिल्ह्यातील भोईसर तारापूर औद्योगीक क्षेत्रातील भारत केमीकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशामक दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना थुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

06:30 July 04

सोलापूर पोलिसांनी मराठा आंदोलनास परवानगी नाकारली

सोलापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शहरात संचारबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील हा मोर्चा काढणार असल्याची भूमिका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मांडली आहे. 

Last Updated : Jul 4, 2021, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details