महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Today Top News : राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - शेख हसीना आजपासून भारत दौऱ्यावर

TODAYS TOP NEWS राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर. आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today Top News
Today Top News

By

Published : Sep 5, 2022, 7:28 AM IST

शेख हसीना भारत भेट :बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आजपासून भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींसोबत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतातून नेपाळ आणि भूतानला अन्न पुरवठा, वस्तू पाठवण्याची परवानगी घेऊ शकतात. तसेच पंतप्रधान शेख हसीना अजमेर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 2019 नंतर हसीनाची ही पहिलीच भारत भेट असेल.

शेख हसीना भारत भेट

टोकियो पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकासाठी सुहास यथीराजची झुंज सुरूच, तरुण धिल्लन कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत

भारताच्या तरुण धिल्लनला बॅडमिंटन पुरुष एकेरी SL-4 कांस्यपदकाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानने 2-0 ने पराभूत केले. फ्रेडीने हा सामना 21-17 आणि 21-11 असा जिंकला. दुसरीकडे, गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास यथीराज अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी आपले आव्हान सादर करत आहेत.

ईडी संचालक :ईडी संचालकांच्या कार्यकाळ वाढविण्याबाबत आज सुनावणी

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय मिश्रा यांच्या मुदतवाढीला आव्हान देणाऱ्या आठ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला आणि तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या याचिकांचा समावेश आहे. याचिकांमध्ये पाच वर्षांनी मुदतवाढ देण्यासंदर्भातील दुरुस्तीलाही आव्हान देण्यात आले आहे.

PM Modi :पंतप्रधान मोदी आज त्यांच्या निवासस्थानी पुरस्कार विजेत्या शिक्षकांची भेट घेणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सोमवारी या वर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची भेट घेणार आहेत. सात लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी साडेचार वाजता ही बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्वोच्च न्यायालय : फरारी विजय मल्ल्याविरुद्ध अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज शिक्षेवर निर्णय देऊ शकते.

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरुद्ध अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज शिक्षेवर निकाल देण्याची शक्यता आहे. किंगफिशर एअरलाइन्सच्या 9 हजार कोटी रुपयांहून अधिक बँक कर्ज थकबाकीच्या प्रकरणात मल्ल्या दोषी आहे.

प्रवेश सुरू : दिल्लीच्या तांत्रिक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आजपासून २५ पर्यंत नोंदणी

दिल्लीतील तांत्रिक विद्यापीठांमध्ये सोमवारपासून प्रवेशाची शर्यत सुरू होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १७७ जादा जागांवर प्रवेश मिळणार आहेत. एकूण ६५४९ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने (NSUT) याबाबत सर्व तयारी केली आहे. प्रवेशासाठी, विद्यार्थ्यांना संयुक्त प्रवेश समुपदेशन (JACK) दिल्लीच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे.

राजनाथ सिंह : संरक्षण मंत्री आजपासून पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार, जपानी समकक्षांशी '2+2' चर्चा करणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तो मंगोलिया आणि जपानला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांसोबत भारताचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध वाढवणे हा आहे. जपानमध्ये, राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर त्यांच्या जपानी समकक्षांशी 'टू प्लस टू' स्वरूपात परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद साधतील.

राजनाथ सिंह

सायरस मिस्त्री :सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन Tata Group Cyrus Mistry death होते. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मृतात जहांगीर दिनशा पंडोल आणि सायरस मिस्त्री यांचा समावेश आहे. जखमीमध्ये अनायता पंडोले (महिला), दरीयस पांडोले यांचा समावेश आहे. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य आहे.

सायरस मिस्त्री

अमित शाह :अमित शाह यांचा मुंबई दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असून सकाळी साडे दहा वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. बैठका घेतील. त्यानंतर शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतील.

अमित शाह

नितीश कुमार :नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नितीश कुमार दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला 50 जागाही मिळणार नसल्याचे वक्तव्या त्यांनी केले होते. त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विरोधक काय निर्णय घेणार यांची हे येणारा काळच ठरवेल.

नितीश कुमार

ABOUT THE AUTHOR

...view details