मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७८५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२२०० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५९० रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये आज जोरदार वाढ पाहावयास मिळत आहे. सोने १३१० रुपयांनी महाग झाले आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५२२०० रुपये
- दिल्ली - ५२००० रुपये
- हैदराबाद - ५२२०० रुपये
- कोलकत्ता - ५२०० रुपये
- लखनऊ - ५२२७० रुपये
- मुंबई - ५२२०० रुपये
- नागपूर - ५२२५० रुपये
- पुणे - ५२२५० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६५००० रुपये
- दिल्ली - ५९००० रुपये
- हैदराबाद - ६५००० रुपये
- कोलकत्ता - ५९००० रुपये
- लखनऊ - ५९००० रुपये
- मुंबई - ५९००० रुपये
- नागपूर - ५९००० रुपये
- पुणे - ५९००० रुपये
सोन्याचे दर वाढणार :परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा :खुशखबर.. 'या' जिल्ह्यात दोन रुपयांनी डिझेल झाले स्वस्त.. पेट्रोलची किंमत मात्र वाढतीच.. पहा आजचे दर