मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. आज मुंबईत 940 रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 940 नवे रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 13 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 82 हजार 814 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 791 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 880 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 55 हजार 860 वर गेला आहे. सध्या मुंबईत 13 हजार 157 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 196 दिवसांवर -