मुंबई -काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या ( Corona Patient Increasing ) झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 877 नवीन ( Todays Corona Patient Number In Maharashtra ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या ५० नव्या ( New omicron Patient ) रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
राज्यात आज 11 हजार 877 रुग्णांचे निदान -
राज्यात कोरोनासह नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात झपाट्य़ाने वाढत आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाची यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात आज 11 हजार 877 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 66 लाख 99 हजार 868च्या घरात पोहचली आहे. तर 2069 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 12 हजार 610 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.21 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 6 कोटी 92 लाख 59 हजार 618 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 9.67 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 43 हजार 250 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1091 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. दरम्यान, सद्यस्थितीत एकूण 42 हजार 024 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे आतापर्यंत 510 रुग्ण
राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 50 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे मनपा 34 भागातील आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 2, ठाणे आणि मुंबई अनुक्रमे 1 रुग्ण सापडला आहे. ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या यामुळे 510 झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.